पलूसला वेध पालिका निवडणुकीचे; सत्ताधाऱ्यांसह विरोधकही सावध भूमिकेत  
पश्चिम महाराष्ट्र

पलूसला वेध पालिका निवडणुकीचे; सत्ताधाऱ्यांसह विरोधकही सावध भूमिकेत

पलूस नगरपालिकेची दुसरी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पलूस शहरात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत

संजय गणेशकर

पलूस : पलूस नगरपालिकेची दुसरी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पलूस शहरात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षणानंतरच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. पलूस पालिकेची मुदत २७ डिसेंबर रोजी संपणार आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या नेते व कार्यकर्ते निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा, तर्कवितर्क करताना पहायला मिळत आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणानंतरच पालिका निवडणुकीला राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, वसंतराव पुदाले तसेच स्वाभिमानी विकास आघाडीचे संस्थापक बापूसाहेब येसुगडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात आता पालिकेत रणांगण रंगणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व काँग्रेसचे स्थानिक नेते व विरोधी पक्षाचे नेते पालिका निवडणुकीत काय रणनीती आखतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष, आघाडी स्वतंत्रपणे लढले, आता कोण कोणाबरोबर युती करणार, काँग्रेस कोणाला सोबत घेणार, स्वाभिमानी विकास आघाडी कोणाबरोबर युती करणार, याबाबत सध्या उलट- सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मात्र, कोणतीही युती झाली तरी ती सध्या लगेचच होणार नसल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात युती होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत असून तो पर्यंत कोणताच पक्ष, आघाडी आपले पत्ते खुले करणार नाही. तोपर्यंत फक्त चर्चाच होत राहतील. सध्या काँग्रेस पक्षात विद्यमान नगरसेवकांसह अनेकजण पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. विरोधकही उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. मात्र, प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतरच कार्यकर्ते तयारीला लागणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस पक्षाला पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. तर विरोधकांनी शहरातील समस्येबाबत काय आवाज उठवला. याचा हिशेब द्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT