Palus Municipal Newsletter: The stewards rush to complete the pending works 
पश्चिम महाराष्ट्र

पलूस पालिका वार्तापत्र : कारभाऱ्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ

संजय गणेशकर

पलूस (जि. सांगली) : पलूस नगरपालिकेतील सत्तेला फक्त नऊ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची उर्वरित कालावधीत आपापल्या प्रभागांतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत सर्वात महत्त्वाच्या मंजूर पिण्याच्या पाण्याच्या स्वतंत्र पाणी योजनेचा प्रारंभ होणे अपेक्षित आहे. 

पलूस पालिका स्थापन झाल्यानंतर प्रथमच कॉंग्रेसची सत्ता आली. नवीन निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांना कोणालाच नगरपालिका कारभाराबाबत माहिती नव्हती. मात्र, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्याचा काहींना अनुभव होता. पहिले वर्ष कामकाजाची माहिती होण्यातच गेले. त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत इतर नगरपालिकांच्या बरोबरीने चांगले काम मिळवून पलूस पालिकेने शासनाचे पुरस्कार मिळवले. 

स्व.आमदार डॉ. पतंगराव कदम आणि त्यानंतर राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सातत्याने नगरपालिका कारभारात लक्ष घातले. डॉ. विश्वजित कदम हे वेळोवेळी पालिकेत येऊन बैठका घेतात. अडचणी समजावून घेतात. असाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे ठरवले आहे. पलूससाठी 35 कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. लवकरच निविदा निघून योजनेच्या कामाचा प्रारंभ होणे अपेक्षित आहे. याशिवाय रस्ते, गटारी व इतर कामे निधी उपलब्ध होतील. तशी सुरू आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत ही कामे थांबली होती. होत असलेली कामे दिलेल्या मुदतीत आणि दर्जात्मक होणे गरजेचे आहे. झालेल्या व सुरू असलेल्या कोणत्याही कामाच्या ठिकाणी संबंधित कामाच्या तपशिलाचे फलक ठेकेदार लावत नाहीत. पालिका प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. 

पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा आणि पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. याचा फायदा कॉंग्रेसला झाला होता. नगराध्यक्ष आणि 12 नगरसेवक कॉंग्रेसचे निवडून आले. तर पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीने 4 ठिकाणी विजय मिळवला होता. फक्त 1 जागा भाजपला मिळाली होती. तर राष्ट्रवादी खाते उघडू शकली नाही. 

आता पालिका निवडणुकीला नऊ महिने उरले आहेत. सत्ताधारी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष तब्बेतीच्या कारणास्तव पालिकेच्या कारभारासाठी वेळ देऊ शकले नाहीत. मात्र, इतर पदाधिकारी व कॉंग्रेस नगरसेवक उर्वरित कालावधीत आपापल्या प्रभागांतील कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करीत आहेत. 

प्रभाग रचना बदलणार ? 
सध्या असलेल्या प्रभागांची येत्या पालिका निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना नव्याने होणार आहे. तसेच एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून द्यायचा आहे. अशा नवीन पद्धतीने निवडणूक होईल, अशी चर्चा आहे. मात्र, अद्यापतरी याबाबत काही माहिती, आदेश उपलब्ध नाही, असे तहसीलदार निवास ढाणे यांनी सांगितले. 
 
संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT