In Palus taluka, there is illegal transport of sand sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

उपसा, वाहतुकीस बंदी; मग वाळू येते कुठून?

सकाळ वृत्तसेवा

पलूस (सांगली) - तालुक्‍यात वाळू, मुरुम, दगडाची बेकायदेशीर वाहतूक बंद असल्याचे सांगितले जाते, मात्र रात्रीच्यावेळी वाळू वाहतूक कशी सुरू असते ? ही वाळू येते कोठून ? वाळू वाहतुकीस कोणाचा आशीर्वाद आहे,  असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

बाहेरील जिल्ह्यातील वाळूही येते तालुक्‍यात

पलूस तालुक्‍यात बेकायदेशीरपणे वाळू, मुरुम व दगडाची वाहतूक होते. कृष्णा, येरळा नदीच्या पात्रातून वाळू उपसाबंदी आहे. मात्र, अनेकवेळा वाळू उपसा व वाहतूक करताना तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी वाहने पकडून कायदेशीर कारवाई केली. पुन्हा पुन्हा वाळू चोरी व वाहतूक सुरूच आहे.
सध्या वाळूला सोन्याचा दर मिळत आहे. बाहेरील जिल्ह्यातील वाळूही तालुक्‍यात येते. रात्री आणि पहाटे वाळूचे ट्रक आणि डंपर येतात. अवैध वाळू वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल नागरिक करीत आहेत.

एजंटांची आहे साखळी

दगड, माती आणि मुरुम वाहतूकही पलूस तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात होते. नाममात्र रॉयल्टी भरुन, भरमसाठ मुरुम, दगड, मातीची वाहतूक होते. परवाने काढून देणे, कमीशन घेऊन वाळू, दगड, माती, मुरुम पुरवणारी एजंटांची साखळी तयार 
झाली आहे.

 अवैध वाहतूकीस आळा घालण्याची मागणी

तहसीलदार वारंवार बेकायदेशीर वाहतूकीवर कारवाई करतात. मात्र, पुन्हा वाहतूक सुरू असते. बेकायदेशीर वाळू, मुरुम, दगड वाहतूक होत नसेल तर मग ती रात्री आणि पहाटेच्या वेळी करण्याचे कारण काय. रात्री पोलिस फिरत असतात. पोलीस अशा वाहनांना अटकाव का करीत नाहीत, असा प्रश्‍न विचारला जात आहे.जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्वरीत अशा अवैध वाहतूकीस आळा घालावा, अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

Mumbai News: कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने! वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT