Pandey left the pichad 
पश्चिम महाराष्ट्र

यांनी सोडली पिचडांची साथ 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निष्ठावंत मानले जाणारे नेते आणि अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी आज पिचड यांच्यावर नाव न घेता टीका करीत, "आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहोत,' हे स्पष्ट केले. पिचड यांना हा मोठा धक्का मानला जात असून, ते एकाकी पडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पक्षांतराचा निर्णय जनतेला अमान्य 
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक सहकारी पिचड यांची साथ सोडणार, अशी चर्चा होती. त्यात पांडे यांच्या नावाचीही चर्चा होती. पांडे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करीत, ही चर्चा खरी असल्याचे सिद्ध केले. ""पक्षांतराचा निर्णय तालुक्‍यातील जनतेला मान्य झाला नाही. पराभवाने जुने निष्ठावान कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असताना संवाद नाही. पराभवाची कारणे शोधणे आणि मतदारांचे आभार मानणे सोडा; उलट कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचा प्रकार सुरू झाला आहे,'' अशी टीका करून 
पांडे म्हणाले, ""आम्हाला व तालुक्‍याला भाजपची विचारसरणी पटणारी नव्हती व नाही. तरीही नेत्याविषयी व्यक्ती म्हणून प्रेम असल्याने, विधानसभा निवडणुकीत काम केले. प्रत्येक निवडणुकीत बरोबर असणारे बाळासाहेब थोरात या वेळी बरोबर नसल्याने व पक्षांतराचा निर्णय मान्य न झाल्याने जनतेने भाजप विचारसरणी धुडकावत "राष्ट्रवादी'च्या डॉ. लहामटे यांना विजयी केले. 

पिचडांकडून अपमानास्पद वागणूक 
या अनपेक्षित पराभवाने पिचड यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. नेत्याचा मात्र कोणाशीही संवाद नाही. पराभवाची कारणमीमांसा करणे, मतदारांचे आभार मानणे अपेक्षित असताना, उलट कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचा प्रकार सुरू झाला. संस्थेतही पदाधिकाऱ्यांना अपमानित केले जाऊ लागले. तालुक्‍याचा विकास करताना कार्यकर्त्यांचे थोडे का होईना, योगदान असते. पराभवात झालेल्या चुका खुल्या दिलाने मान्य करून सुधारणा करायच्या असतात. दुसऱ्यावर खापर फोडायचे नसते.'' 

मी "राष्ट्रवादी'मध्येच ः पांडे 
""विधानसभा निवडणूक प्रस्थापित विरुद्ध जनता अशी झाली. याचा अनुभव तालुक्‍याने घेतला. म्हणून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे कोणी सहकार्य करील, त्यांना बरोबर घेऊन माझी पुढील वाटचाल सुरू राहणार आहे. मी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांना मानणारा आहे. त्यामुळे अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे. सहकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे,'' असेही पांडे यांनी स्पष्ट केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT