0corona_498.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग! पंढरपूर, सांगोला, माढा कोरोनामुक्‍त; शुक्रवारी 'या' गावात सापडले कोरोनाचे सहा रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्‍कलकोट तालुक्‍यातील बुधवार पेठेत दोन, बोरगाव व सलगर येथे प्रत्येकी एक तर दक्षिण सोलापुरातील वांगी, मुळेगाव याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. दुसरीकडे माढा, पंढरपूर व सांगोल्यातील सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आता हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत.


तालुकानिहाय उपचार घेणारे रुग्ण
अक्‍कलकोट : 37
बार्शी : 20
करमाळा : 1
माढा : 0
माळशिरस : 1
मंगळवेढा : 0
मोहोळ : 10
उत्तर सोलापूर : 6
पंढरपूर : 0
सांगोला : 0
दक्षिण सोलापूर : 78


जिल्ह्यातील 29 जणांचे अहवाल पेन्डींग
शुक्रवारी जिल्ह्यातील 119 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार सहाजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. आता जिल्ह्यातील 29 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शुक्रवारी एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तर तिघेजण कोरोनामुक्‍त होऊन घरी परतल्याचे आरोग्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

जिल्ह्यातील संसर्ग येतोय आटोक्‍यात
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 26) अक्‍कलकोट तालुक्‍यातील बुधवार पेठ, बोरगाव, सलगर याठिकाणी चार तर दक्षिण सोलापुरातील वांगी, मुळेगाव याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण सापडले आहेत. समाधानकारक बाब म्हणजे माढा व पंढरपूर तालुक्‍यातील सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सांगोल्यातील सर्व रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. जिल्ह्यातील 266 रुग्णांपैकी 14 जणांचा मृत्यू झाला असून 153 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT