parents are laborers, grandmother sells vegetables, grandson became a Deputy Superintendent of Police 
पश्चिम महाराष्ट्र

आईवडील मजूर, आजी विकते भाजी... नातू झाला पोलिस उपअधीक्षक 

हिंम्मतराव नायकवडी

बिळाशी (जि. सांगली) : आईवडील मोलमजुरी करीत असल्याने त्यांनी त्याला आठवीपर्यंत शिकवले. मात्र त्याची शिक्षण्याची इच्छा बघून आजीकडे पाठवले. आजीनेही भाजी विकून पै पै जमवीत त्याला पदवीपर्यंत शिकवले. त्यानेही स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आपल्या संवर्गातून पहिला येत त्यांची कष्टांचे चीज केले आहे. अमर मानसिंग मोहिते या जिद्दी युवकाची ही कथा. पोलिस उपअधिक्षक पदी त्याची निवड झाली आहे. 

मांगरुळ (ता. शिराळा ) येथील नालंदा अभ्यास केंद्रात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून सन 2018 मध्ये अवघ्या दीड वर्षांच्या अभ्यासानंतर पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून उपशिक्षणाधिकारी पदी त्याची निवड झाली होती. सध्या त्याचे जिल्हा परिषद, सातारा येथे प्रशिक्षणही चालू होते. मात्र त्यावरही समाधान न मानता त्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षाही दिली. त्याचा आज निकाल जाहिर झाला आणि ते एनटी बी संवर्गातून पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर राज्यात प्रथम आले आहेत. 

अमर मोहिते मूळचे नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील. आईवडीलांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. आई रेखा, वडील मानसिंग मोहिते यांनी रोज मोलमजुरी केल्याशिवाय घरची चुल पेटत नव्हती. याही परिस्थितीला सामोरे जात अमर यांनी मुळगावी आठवीपर्यतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. परिस्थिती साथ देत नव्हती, मोलमजुरीची कामे दररोज मिळतीलच अशी परिस्थिती नव्हती. मुलाची शिकण्याची प्रबळ इच्छा असल्याने आईवडीलांनी अमरला मांगरुळ (ता. शिराळा) येथे आजोळी आजी इंदूताई पवार यांच्याकडे पाठवले.

तिथेही आजी-आजोबांची परिस्थितीही बेताचीच होती. परंतु नातवाची शिकण्याची इच्छा पाहून आजी सकाळी डोळा उघडला की दिवसभरात शंभर-दोनशे रूपये कसे कमवायचे हा विचार डोक्‍यात घेत उसनवारी करुन दोन-तीन प्रकारची भाजी विकत घ्यायची. ती रस्त्यावर विकायची त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून रोज संध्याकाळी चुल पेटत होती. अशा परिस्थितीत अमरचे पदवीपर्यंतचे शिक्षण आजी-आजोबांनी पूर्ण केले. त्यानेही आजी-आजोबांच्या कष्टाची जाणीव ठेवत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला. त्यातच नालंदा अभ्यास केंद्राचे मार्गदर्शक सिंधुदुर्ग अँनटीकरपशनचे पोलीस उपाधिक्षक दिपक कांबळे यांचे त्यास पाठबळ मिळाले आणि त्याच्या पंखात आणखीनच बळ आले. त्याने पोलिस उपअधीक्षक परीक्षा पास होण्याची हमीच श्री. कांबळे यांनी दिली आणि ती पूर्णही केली आहे. 

रिस्थितीची जाण आणि निश्‍चित ध्येयाचे भान
कौटुंबिक परिस्थितीची जाण आणि निश्‍चित ध्येयाचे भान असल्यास आपल्याला ठरवलेल्या यशापासून कोणीहि परावृत्त करू शकत नाही. 

- अमर मोहिते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT