corona.jpg
corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महापालिका क्षेत्रात आणखी दहाजणांना कोरोना..गणपती पेठ, कलानगर, दत्तनगरसह मिरजेत रूग्ण आढळले 

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्ह्यातील ग्रामीण भागात "कोरोना' चे रूग्ण वाढत असताना आज महापालिका क्षेत्रात आज नव्याने दहा कोरोना "पॉझिटिव्ह' रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील "कोरोना' बाधित रुग्णांचा आकडा 35 वर पोहचला आहे. त्यामध्ये चौघा परदेशवारी करून आलेल्या चौघांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात रूग्ण वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

आज दिवसभरात दहा जणांचा "कोरोना' अहवाल पॉझिटीव्ह येताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने सर्व ठिकाणी भेटी देत खबरदारीच्या उपाययोजनाना सुरूवात केली आहे. आजच्या नव्या रुग्णामध्ये कलानगर येथील एक पुरुष आहे. तो सिव्हीलमध्ये कोरोना बाधित झालेल्या परिचारकाच्या संपर्कात आला होता. तसेच कलानगर परिसरात दत्त मंदिर नजीकच्या एका व्यक्तीस कोरोना झाला आहे. कर्नाळ रोड दत्तनगर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या महिलेच्या घरी वाहन चालक व मजुरीसाठी बाहेर ये-जा करणारे लोक आहेत. त्यामुळे महिला बाधित झाली असावी अशी शक्‍यता आहे. 

शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या गणपती पेठेतील गुजरी बोळात येथे 71 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. या वृद्धांचे याच परिसरात नॉव्हेल्टी शॉप आहे. तसेच शंभर फुटी रस्ता येथील एका खासगी रुग्णालयातील एका परिचरिके महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या रूग्णालयातील डॉक्‍टरांचा खासगी लॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

तसेच विश्रामबाग येथे हॉटेलमध्ये क्वारंटाईन झालेल्या चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चौघेजण नुकतेच परदेशवारी करून सांगलीत आले होते. तसेच मिरज विजापूर वेस परिसरात एक नवा रुग्ण सापडला आहे. या सर्व ठिकाणच्या परिसरात महापालिकेने खबरदारी म्हणून औषध फवारणी केली आहे. तसेच आशा वर्कर्सकडून घरभेटी सुरू करून नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. परिसराचा रॅपिड सर्व्हेही सुरु करण्यात आला आहे. 

आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. सुनील आंबोळे, डॉ. वैभव पाटील, डॉ. शीतल धनवडे, सहायक आयुक्त सावता खरात, सहदेव कावडे, दत्तात्रय गायकवाड यांच्या टीमकडून उपाययोजना केल्या जात आहेत. बंडा जोशी आणि याकूब मद्रासी यांच्या टीमकडून सर्व ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. रूग्ण आढळलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन करण्याबाबत आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी नियोजन सुरु केले आहे. परिसरात वैद्यकीय टीमद्वारे सर्व्हेही सुरू झाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT