Patil, Dr. Vikhe moved to break the Congress
Patil, Dr. Vikhe moved to break the Congress 
पश्चिम महाराष्ट्र

नगरची कॉंग्रेस फोडण्यासाठी पाटील, डॉ. विखे सरसावले

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या पहिल्याच स्मृतिदिनानिमित्त कॉंग्रेस आघाडी फोडण्यासाठी रणनीती आखली गेली. कार्यक्रमाला आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सोबत घेत, नागवडे कुटुंबाशी बंद खोलीत राजकीय चर्चा केली. नागवडे यांनी वेगळा विचार करावा, यावरच पाटील यांनी भाषणात भर दिला होता.

शिवाजीराव नागवडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम राजकीय कोपरखळ्या, पक्षबदलाचे संकेत व नेत्यांच्या बंद खोलीतील चर्चेने गाजला. योगीराज महाराज पैठणकर म्हणाले, की "बापूं'च्या कार्याची व्याप्ती मोठी असून, या नेत्याला तालुक्‍यातच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात मान होता.

आमदार राहुल जगताप यांनी "बापूं'मुळे आमदार झाल्याचे सांगितले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही "बापूं'च्या कामाचा गौरव केला. "सध्या कोण कुठे पळतंय, हे समजत नाही. मध्यंतरी गायब झालेले हर्षवर्धन पाटील आज येथे सापडले,' असा थेट टोलाही मारला. त्यावर पाटील यांनी, ते "कायम रिचेबल' असतात, असे सांगितले. "नागवडे कुटुंबाने वेगळा विचार करावा. त्यासाठी विखे पाटील ते मुख्यमंत्री, असा प्रयत्न करावा लागेल,' असे सांगत नागवडे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सुचविले.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. विखे पाटील, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा केली. बैठकीतील चर्चेचा तपशील समजला नसला, तरी पाटील व डॉ. विखे पाटील यांनी आघाडीला सुरुंग लावण्याची रणनीती आखल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT