पश्चिम महाराष्ट्र

पट्टणकोडोली येथील बिरदेव यात्रेस आजपासून सुरुवात

सचिनकुमार शिंदे

पट्टणकोडोली - महाराष्ट्रासह पाच राज्यात प्रसिद्ध असणारी व लाखो भाविकांचे दैवत श्री.विठ्ठल बिरदेवाची यात्रेस आजपासून सुरुवात झाली. यात्रेसाठी शेकडो मैलांवरून भक्तगण आले आहेत. यात्रा परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी थांबून अखंडपणे धनगरी ओवी गायनाचा कार्यक्रम हे भाविक करीत आहेत. बिरदेवावरील निस्सिम भक्ती पोटी धनगरी ओव्यां गायल्या जातात. असा कार्यक्रम  या  यात्रा परिसरात सुमारे वीसहून अधिक ठिकाणी अखंडपणे चालू आहे. यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र कर्नाटकसह विविध राज्यातून भाविक या यात्रेला येतात. यात्रेतील मुख्य सोहळा म्हणजे फरांडे बाबांची भाकणुक. ही भाकणुक आज  होणार असल्याने लाखो भाविकांनी पट्टणकडोली येथे हजेरी लावली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा पारंपरिक पद्धतीने यात्रा पार पाडण्यासाठी समस्त पुजारी धनगर समाज व ग्रामपंचायतीने मोठ्या उत्साहाने सर्व नियोजन केले आहे.  

गेली दोन दिवसांपासून विराजमान झालेल्या मानाच्या दगडी गादीवरून उठून फरांडे बाबा आज दुपारच्या सुमारास हेडाम (तलवारीचे पोटावर वार करणे ) नृत्य करणार आहेत. या अलौकिक सोहळ्यानंतर ते देवाच्या भेटीसाठी आतुर होऊन श्री. विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील.व त्या ठिकाणी भाकणुक (देववाणी) करणार आहेत.या भक्तीमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.

भाविकांच्या संख्येबरोबरच यात्रा काळात होणारी उलाढाल लक्षात घेऊन शेकडो व्यावसायिकांनी ही येथे आपली दुकाने थाटली आहेत.अनेक विविध नमुण्याचे पाळणे, मनोरंजन खेळ करणारी दुकाने, त्याच बरोबर येथे ढोलाच्या कड्या व घोंगड्याचा सर्वात मोठा बाजार भरला जातो. या विक्रेत्यांसाठी ही यात्रा कमिटीने स्वतंत्र व्यवस्था करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT