Pavatya beans from Devadi Shivara became a brand 
पश्चिम महाराष्ट्र

लादेवाडीच्या शिवारातील पावट्याच्या शेंगांचा झाला ब्रॅंड 

भगवान शेवडे

मांगले : एखाद्या उत्पादनाचा, उद्योगाचा स्वतंत्र असा ब्रॅंड तयार करण्यासाठी अनेकांची कित्येक वर्षाची मेहनत असते. मात्र शिराळा तालुक्‍यातील लादेवाडीच्या शिवारातील पावट्याच्या शेंगांचा ब्रॅंड लादेवाडीच्या शिवारातील मातीतच तयार झाला आहे. लादेवाडीच्या शिवारातील मातीत पिकणा-या पावट्याच्या शेंगाची चवच न्यारी आहे. लादेवाडीतील विशेषतः महिला प्रत्येक वर्षी या देशी पावट्याची पेरणी करतात. देशी पावट्याच्या बियाणांची साठवणूक अनेक वर्षापासून लादेवाडीत केली जाते. 

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर लादेवाडीतील पावट्याच्या शेंगा मांगलेच्या बाजार पेठेसह पंचक्रोशीत हमखास मिळतात. नव्हे त्या गावात येण्याची वाट काही ग्रामस्थ पाहत असतात. रासायनिक खतांशिवाय, कोणत्याही किटकनाशकाशिवाय आणि पाण्याशिवाय थंडीतील दवावर आलेल्या या शेंगांची चव चाखायची असेल तर कोणत्याही मसाल्याशिवाय बनवलेली आमटी केल्याशिवाय ती कळणार नाही. 

बाजारात आज मिळणा-या संकरीत पावट्याच्या शेंगापेक्षा पाच दहा रुपये जादा दराने विक्री होत असलेला पावटा महिनाभरच मिळतो. या कालावधीत घरगुती, शेतात खास पावटा पार्टीचा बेत फक्त मांगले परिसरात केलेला पाहायला मिळतो. 

गावाला शेतीच्या पाण्याची उपलब्धता नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पिकाबरोबर देशी पावटा शिवारात पेरला जातो. त्याच्या शेंगा पावसाळा संपल्यानंतर थंडीच्या दिवसात तोडणीसाठी येतात. बियाणे घरचे देशी असल्यामुळे वेगळी चव आहे. दरवर्षी थंडीच्या दिवसात शेंगांना हमखास मागणी असते. 
- कलाबाई नामदेव खोत, लादेवाडी 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT