Penalty with crime if rules are broken: Collector Dr. Chaudhary 
पश्चिम महाराष्ट्र

नियम मोडाल तर गुन्ह्यासह दंड : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

विष्णू मोहिते

सांगली : कोरोनाबाबत प्रत्येकानेच काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. सध्या बहुतांश ठिकाणी कोरोना आचारसंहितेचे पालन होत नाही. जिल्ह्यात आजच्या घडीला कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढली; तर निर्बंध लावणे प्रशासनाला भाग आहे. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे नियंत्रणात असलेली स्थिती बिघडायला वेळ लागणार नाही, असे मत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कर्नाटकात प्रवेश करताना कोरोनाची चाचणी करणे गरजेचे केल्याचे वाचनात आले. अद्याप राज्य शासनाने जिल्हा प्रशासनास तसे आदेश दिलेले नाहीत. मात्र आदेश आले, तर परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. प्रशासन आपल्यापरीने नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहे.

नागरिकांनाही आपण कसे वागायचे हे ठरवणे गरजेचे आहे. अद्याप कोरोना गेलेला नाही. त्यामुळे कोरोना आचारसंहितेचे पालन होणे आवश्‍यक आहे. गर्दीच्या कोणत्याच कार्यक्रमांना प्रशासनाची परवानगी असणार नाही. त्यामुळे सभा, आंदोलने, मोर्चे, मेळावे आदी कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभात उपस्थित राहण्यास 50 व्यक्तींनाच परवानगी आहे. त्यापेक्षा अधिक जणांची उपस्थिती लक्षात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.'' 

ते म्हणाले,""नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी बेजबाबदार वागणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. तरीही नागरिकांत बेफिकिरी कायम आहे. प्रशासनाने कितीही मनात आणले तरी जोपर्यंत नागरिकांचे सहकार्य मिळणार नाही, तोपर्यंत यश मिळणार नाही. बाहेर पडताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन अपरिहार्य राहणार आहे. बसस्थानक, दुकानदार, हॉटेल, खासगी क्‍लास तसेच जेथे गर्दी होते त्याठिकाणी नियमांचे पालन होते, की नाही हे पाहण्यासाठी तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांना संबंधितांवर गुन्हा व दंड करण्याचे अधिकार दिलेले आहेत. सध्या दंडाची रक्कम 20 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल.'' 

नाईलाजाने कठोर पाऊल : डॉ. चौधरी 
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोरोनाबाबत अद्याप काही नागरिक गंभीर नाहीत. मला काय होणार? मी कोरोनाला घाबरत नाही, ही वृत्ती बदलण्याची गरज आहे. प्रशासन ज्या सूचना देते त्यानुसारच प्रत्येकाने वागणे अत्यावश्‍यक आहे. नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत. सर्वत्र अशीच परिस्थिती राहिली तर नाईलाजाने कठोर पाऊल उचलावे लागेल. 

शाळा, महाविद्यालये सुरू राहणार 
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""शाळा, महाविद्यालये सध्या तरी बंद करण्याचा विचार नाही. मात्र तेथे कोरोना आचारसंहितेचे पालन होते की नाही याची पाहणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

काळजीचे कारण नाही 
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी सांगलीत सध्या तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना 58 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लवकरच ते 80 टक्के पर्यंत पूर्ण होईल. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 96.11 टक्के आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT