पश्चिम महाराष्ट्र

बाजूपट्टीचा मुरूम उकरून नेणे पडले भारी; काय झाले वाचा

सकाळवृत्तसेवा

नवेखेड (जि. सांगली) : मसुचीवाडी - बोरगाव रस्त्याच्या बाजूपट्टीवरील 50 ते 60 ब्रास मुरूम चोरी करणाऱ्यांना "मुरूम परत न केल्यास गुन्हे दाखल करू', अशी नोटिस सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिली आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता टी. एस. शिरगुप्पे यांनी दिली. 
मसुचीवाडी-बोरगाव हा पाच किलोमीटरचा रस्ता दीडवर्षीपूर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या निधीतून तब्बल चार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला. रस्त्याची उंची वाढवून रुंदीकरण व साईडपट्टी मुरमीकरण करण्यात आले. 

काहींनी चक्क जेसीबीने बाजूपट्टी उकरून तब्बल 50 ते 60 ब्रास मुरुम नेला. हे होत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी संबंधितांकडे विचारणा केली. तर "आम्ही नाले काढण्याचा परवाना घेतला आहे' असे सांगण्यात आले 

चांगल्या रस्त्याची बाजूपट्टी उकरून कोणी अशी परवानगी देणार नाही. संबंधीत विभागाने ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता असा प्रकार होत असल्याचे समजताच गावकरी व ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी असा कोणताही परवाना दिला नाही हा तर सरळ सरळ चोरीचा प्रकार घडत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. बेकायदेशीरपणे मुरूम चोरी करणाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. मुरूम त्वरीत जागेवर टाकून रस्ता पूर्ववत न केल्यास गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. जागृत ग्रामस्थांमुळे सध्या हा प्रकार थांबला आहे. 

मुरूम चोरी करणे गुन्हा

जनतेच्या सुविधांसाठी शासन रस्ते बनवते. चांगल्या दर्जाचा रस्ता मिळावा. वाहतूक सुरळीत व्हावी हे पाहिले जाते. रस्त्यावरील मुरूम चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही असे प्रकार घडतात हे गंभीर आहे.

- टी. एस. शिरगुप्पी, उप विभागीय अभियंता,इस्लामपूर 

अन्यथा उपोषण

बांधकाम विभागाने छडा लावावा, अन्यथा उपोषण करू.
- सुहास कदम, सरपंच, मसुचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT