raju.jpg
raju.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

'सरकारमधील लोकांनाच ऐकायचाय डान्समधील पैजणांचा आवाज'

सकाळवृत्तसेवा

सांगली : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील  पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय. कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना झोडपून काढू. देशाची बँकिंग व्यवस्था कुठे चाललीय हा प्रश्न देशाच्या अर्थमंत्र्यांना विचारेन, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सरकारला डान्सबार महत्वाचे वाटतात. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील पैजणांचा आवाज ऐकावा वाटत असेल असे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी डान्स बारच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते

कायदेही आणि न्यायालये तीच आहेत. यापूर्वी न्यायालयाच्या संमतीनेच डान्सबारवर बंदी घातली होती, आता मात्र डान्सबारवरील बंदी न्यायालय उठवते याचा सरळ अर्थ सरकारने आपली बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली नाही. सरकानेच जर खमकी भूमिका घेत आपली बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली असती तर कोर्टाने देखील निश्चितच डान्सबार वरील बंदी उठवण्याचा निर्णय दिला नसता, असा विश्वास देखील शेट्टीनी व्यक्त केला.

कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या जबरदस्तीच्या प्रकरणावरून देखील शेट्टीनी सरकारला लक्ष्य केले आहे. कर्जाच्या बदल्यात बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना इन्शुरन्स पॉलिसीची जबरदस्ती केली जाण हे शेतकऱ्यांच्या अगतीकतेचा फायदा घेतल्या सारखे असून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांनवरील हा अन्याय सहन करणार नाही असे म्हणत प्रसंगी त्या अधिकाऱ्यांना झोडपून काढू पण शेतकऱ्यांवरील हा अन्याय सहन करणार नाही असा इशारा शेट्टीनी दिला आहे. या संदर्भात जर शेतकऱ्यांकडून तक्रार आली तर आरबीआयच्या गव्हर्नरकडे या बँकेच्या अधिकाऱ्यांवर आणि बँकेवर कारवाई  करण्यासाठी आग्रह धरेन असे देखील शेट्टीनी स्पष्ट केले आहे. एका बाजूला निरव मोदी सारखे बँकाना टोप्या घालून जाणारे कर्जदार आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने बँकेत काम करणारे आणि शेतकऱ्यांना लुटणारे कर्मचारी दिसतात. त्यामुळे या देशाची बँकिंग व्यवस्था कुठे चाललीय हा प्रश्न देशाच्या अर्थमंत्र्यांना नकीच विचारेंन असे देखील शेट्टी यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT