people response to vaccination in belgaum available for vaccine 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य विभागाची माहिती

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोना लसीकरणाला सुरवातीला प्रतिसाद मिळत नव्हता, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात रोज सुमारे पाच हजार जणांनी कोरोनाची लस घेतल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. सध्या जिल्ह्यात पुरेशी कोरोना लस आहे, त्यामुळे लसीकरणावर परिणाम होणार नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात बेळगाव कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तीन दिवस कोरोना लसीकरण मोहीम थांबली होती. पण, यापुढे असे होणार नसल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. 

बेळगावात सध्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरीकांना कोरोनाची लस दिली जात आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. जास्तीत नागरीकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा यासाठी आरोग्य विभागाकडून जागृती केली जात आहे. घरोघरी जावून ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरीकांना लस घेण्याची सक्ती केली जात आहे. ७ एप्रिलपर्यंत संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात कोरोना लस घेतलेल्यांची संख्या २६ हजार ६५७ इतकीच होती. पण, त्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. 

मार्च महिन्यांत ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे व गंभीर आजाराने त्रस्त असलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक याना कोरोना लस देण्यात आली. त्याआधी फ्रंटलाईन वर्कर्सना व सर्वात आधी कोरोना वॉरीयर्सना लस देण्यात आली. पण पहिल्या तीन टप्प्यात कोरोना लसीकरणाला प्रतिसादच मिळाला नव्हता. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होती त्यामुळे लस नको अशी भावना जनमानसात निर्माण झाली होती. पण मार्च महिन्यापासून कोरोनाबाधीतांची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्यांदा लॉक डाऊन जाहीर करण्याची स्थिती बेळगावसह राज्यभरात निर्माण झाली आहे. त्यामुळे लसीकरणाचे वेग वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहेच. शिवाय लस घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. 

गुढीपाडव्याच्या दिवशीही लसीकरण मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. शासकीय सुटी किंवा अन्य सुट्ट्यांनाही लसीकरण थांबविण्यात आलेले नाही. खासगी रूग्णालयात लस घेण्यासाठी २५० रुपये मोजावे लागतात. आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रात गेल्यास मोफत लस मिळते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रात जावून लस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. लसीकरणाला प्रतिसाद मिळाल्याने लसीची तुटवडा होऊ नये यासाठी आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. 

"पहिल्या तीन टप्प्यांत लसीकरण मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. पण, आता मात्र प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्ह्यात रोज सुमारे पाच हजार जण कोरोना लस घेत आहेत."

- डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT