CORONA VIRUS 
पश्चिम महाराष्ट्र

वेळ निघून गेलीय पण काळाचं काय सांगावं... शेवगाव, अमरापूरकर धास्तावलेत

सचिन सातपुते

शेवगाव : दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 29 परदेशी नागरिकांपैकी एक गट अमरापूरसह शेवगाव शहरात वास्तवास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेवगावकरांचे धाबे दणाणले आहे. ते येऊन गेल्याच्या घटनेला बराच कालावधी उलटला असला तरी काळ सांगून येत नाही, अशी प्रतिक्रिया गावाकडच्या लोकांकडून येत आहे.

नागरिकांच्या एका गटाने मुकुंदनगर व जामखेड येथे वास्तव्य केले होते. त्यांतील अनेक जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दुसऱ्या गटाच्या शेवगाव कनेक्‍शनमुळे तालुक्‍यातही कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनासह आरोग्य विभागाने संबंधितांच्या संपर्कातील लोकांची यादी करण्यास सुरवात केली आहे. हे नागरिक कुठे, किती काळ वास्तव्यास होते, कोणाकोणाच्या संपर्कात आले, याची माहिती गोळा करण्यात येत आहे. 

दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन 29 परदेशी नागरिकांचे दोन गट जिल्ह्यात रेल्वेने आले. त्यांतील एक गट नगरमधील सर्जेपुरा येथून कोल्हारला, नंतर राहुरीतून अमरापूरला आला. तेथून शेवगावात एके ठिकाणी थांबून नेवाशाला गेल्याचे उघड झाले आहे. त्यांना अमरापूर व शेवगावात कोणी आश्रय दिला, ते कोणाकोणाच्या संपर्कात आले, तसेच त्यांच्याही संपर्कात नंतर अनेक स्थानिक गावकरी आले असण्याचा धोका आहे. 

कालावधी उलटलाय

नागरिकांचा हा गट 19 मार्चच्या दरम्यान तालुक्‍यात वास्तवास होता. त्याला 14 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर रोगाची लागण होण्याचा व संपर्काच्या दक्षतेचा कालावधी संपुष्टात आला आहे. मात्र, तरी संबंधितांच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 
- डॉ. सलमा हिराणी, तालुका आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Budget 2026 : बजेटमधील घोषणा नेमक्या कधी लागू होतात? नागरिकांना फायदा कधीपासून मिळतो, जाणून घ्या

Nashik Crime : नाशिकमध्ये बडतर्फ पोलिसाचा लॉजमध्ये संशयास्पद आढळला मृतदेह? इरफानच्या मृत्यूमागील गूढ कायम, उलटसुलट चर्चांना उधाण

IGNOU 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! IGNOU री-रजिस्ट्रेशनची डेडलाइन पुढे ढकलली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Airtel Recharge Plan : एअरटेलच्या कोट्यवधी युजर्सना मोठा धक्का! कंपनीने एका रात्रीत बंद केली तुमची पसंतीची फ्री सर्व्हिस

SCROLL FOR NEXT