Persons who remember the eight hundred vehicle number kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

लई भारी ! तब्बल ८०० वाहनांचे क्रमांक पाठ असणारे बापूसाहेब...

प्रकाश नलवडे

कोल्हापूर - हलसवडे (ता. करवीर) येथील बापूसाहेब अण्णासाहेब पाटील (खानू) यांचे पंचक्रोशीतील सुमारे ८०० वाहनांचे नंबर तोंडपाठ आहेत. वाहनांचे नंबर सीरियलसह पाठ असल्यामुळे अनेक वेळा त्यांची पोलिसांनाही मदत होत आहे. खानूच्या वडिलांचे निधन ते आठवीत असतानाच झाले. त्यावेळी सांगवडेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. पहिली ते सातवी हलसवडे गावात शिक्षण झाले. खानू, त्याचा भाऊ आणि आई शेती करतात. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी शाळा सोडली. आईला मदत म्हणून कामाला जाऊ लागले.

असा लागला छंद

शाळेत हुशार नव्हते; पण त्याला वेड लागले गाड्यांचे नंबर लक्षात ठेवायचे. एमआयडीसीमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना तिथे आलेल्या डंपरच्या किती खेपा झाल्या ते मोजायचे काम खानू यांच्याकडे होते. रोज २५-३० खेपा होत होत्या. खानू त्या मोजताना कुठेही लिहून ठेवत नव्हते. कामावरील व्यवस्थापक  लिहून घ्यायचे आणि शेवटी खानूला विचारले की दोघांचे हिशेब तंतोतंत जुळत होते.

पोलिसांनाही होते मदत

नेर्लीच्या ओढ्याजवळ एक अपघात झाला होता. त्या गाडीच्या नंबरवरून मालकाचे नाव शोधण्यासाठी पोलिस चौकशी करत होते. ग्रामस्थांनी खानूचे नाव करवीर पोलिसांना सांगितले. 
पोलिस खानूला भेटले. काही क्षणातच त्यांनी ती गाडी रजपूत यांची असल्याचे सांगितले. पोलिस तिथे गेले तर ती गाडी खरंच रजपूत यांचीच होती. त्यावेळी करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस आले की नेहमी खानू यांना भेटत होते. विशेष म्हणजे, गावात आलेल्या एस.टी.चे नंबर तोंडपाठ आहेत. एकदा गावात एक नवीन एम-८० मोपेड आणली होती. काही कट्ट्यावर बसलेल्या तरुणांनी खानू यांची टिंगल उडविण्यासाठी आज गावात आणलेल्या  एम-८० मोपेडचा क्रमांक सांगण्यावरून पैज लावली. खानू यांनी क्षणात त्या मोपेडचा क्रमांक सांगून पैज जिंकली.

शाळेतील शिक्षकांच्या गाड्यांचे क्रमांकही मला पाठ आहेत. काही शिक्षक निवृत्त झालेत; मात्र ते आजही 
गावात आल्यानंतर मी त्यांच्या पहिल्या गाडीचा क्रमांक सांगतो. अलीकडे एकाच घरात पाच-पाच वाहने असतात. त्यांचे क्रमांक शक्‍यतो एकसारखे असतात. त्यामुळे ते लक्षात ठेवणे सोपे झाले आहे.
- बापूसाहेब पाटील (खानू)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Sangli Fake IT Raid Case: 'स्पेशल 26' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरच्या घरावर आयकर छापा, सोने व रोकड लंपास | Sakal News

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

SCROLL FOR NEXT