दोन पंन्टर जाळ्यात sakal
पश्चिम महाराष्ट्र

पेठवडगाव : लाच घेताना पोलिस कॉन्स्टेबलसह दोन पंन्टर जाळ्यात

ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सकाळी केली.

सकाळ वृत्तसेवा

पेठवडगाव : वडगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्यात मदत करण्यासाठी व एफआयआर प्रत देण्यासाठी फंन्टरच्या माध्यमातुन पाच हजाराची लाच घेताना पोलिस कॉन्स्टेबलसह दोन पंन्टर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले.ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सकाळी केली.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव(वय ३१,रा.पेठवडगाव पाेलिस ठाणे),पंन्टर चेतन गावडे,(रा,कोरेगाव,ता.वाळवा,जिल्हा सांगली),प्रितम दिपक ताटे(वय २१,रा.पेठवडगाव)या तीघांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिस अशोक जाधव वडगाव पोलिस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत आहेत.यातील तक्रारदार यांच्याविरोधात मटका जुगार अंतर्गत कारवाई केली होती.या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व एफआयआरची प्रत देण्यासाठी तक्रारदाराकडे अशाेक जाधव यांनी विस हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली.या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.वडगाव पोलिस ठाण्याच्या डाव्याबाजुच्या टपरीवर शासकीय पंचासह पथक तैणात होते.पोलिस अशोक जाधव यांनी विस हजार पैकी पाच हजार रक्कम खाजगी व्यक्ति चेतन गावडे यांना देण्यास सांगितले.त्याप्रमाणे तक्रादारांने पाच हजार रक्कम पंन्टर चेतन गावडे याच्याकडे दिली.त्यानंतर ही रक्कम गावडे याने प्रितम ताटे यांचे कडे दिली.यावेळी प्रितम ताटे यास ही पाच हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.चेतन गावडे व प्रितम ताटे हे दोघे भावस भाऊ आहेत.प्रितम ताटे याचा भाजी,वड्याचा गाडा आहे.

ही कारवाई पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शरद पोरे,पो नाईक सुनिल घोसाळकर,मयुर देसाई,रूपेश माने यांच्या पथकने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: घेतलेलं कर्ज परत नाही केलंत? तर तुमचा फोन लॉक होईल, आरबीआयकडून नवा नियम आणण्याची तयारी

लई भारी! दुर्मिळ आजारने त्रस्त असलेल्या बाळाला जॅकलिनची मदत, उचलला शस्त्रक्रियेचा खर्च, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates Live : ज्येष्ठ काँग्रेस नेते, केरळ विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि केपीसीसीचे माजी अध्यक्ष पी. पी. थानकाचन यांचे निधन

Sinnar News : सिन्नर एमआयडीसीत नवीन अग्निशमन बंब दाखल, उद्योगांना मोठा दिलासा

Beed Crime : हुंड्यासाठी अजून एक बळी; गेवराईच्या २२ वर्षीय नवविवाहितेने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT