Petrol, diesel price hikes; Increased tractor cultivation rates 
पश्चिम महाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल दरवाढीचे चटके; ट्रॅक्‍टर मशागतीचे दर वाढवले

दिग्विजय साळुंखे

बोरंगाव : पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीचे चटके आता स्थानिक पातळीवर बसायला सुरुवात झाली आहे. शेतीच्या मशागतीसाठीची ट्रॅक्‍टरसह अनेक उपकरणे डिझेलवर चालतात. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्‍टर मशागतीचे दर वाढवले आहेत. वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या दरांचा शेतकऱ्यांनाही फटका आत बसत आहे. 

गत हंगामाच्या तुलनेत 15 रुपये दरवाढ डिझेलसाठी झाली आहे. त्यामुळे टूँक्‍टरचालकांकडून नवी दरवाढ जाहीर करण्याचे काम सुरू आहे. तासगाव तालुक्‍यातील काही गावात जाहीर न करता वाढीव दराने आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे मशागत, खत दर वाढत असले तरी पिकांचे दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ऊस तोडणी वेळी शेतकऱ्यांची खुशालीच्या नावाखाली लूट झालीच आहे. त्यात नवी भर पडली आहे. 

आता गत हंगामात 74 रुपये असलेला डिझेलचा दर 87 रुपयांवर गेला आहे. मात्र आता आधुनिक युगात यंत्र आल्याने शेतीची कामे ट्रॅक्‍टर, मळणी यंत्र, रोटावेटर, हार्वेस्टर याद्वारे होत आहे. या यंत्रांना पेट्रोल, डिझेलची गरज असते. मात्र आता दररोज डिझेल, पेट्रोलचे दर वाढतच चालले आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्‍टर, मळणी यंत्र, हार्वेस्टर, जेसीपी या यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.ट्रॅक्‍टर चा वाढलेला वापर, दररोज वाढणारे डिझेल दर वाढल्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

शेती मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार आहे. त्यामुळे शासनाने डिझेलची दरवाढ कमी करून दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे." 
- तानाजी सावंत, शेतकरी, निंबळक 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT