Phinix Victory In Kolhapur State Drama Competition  
पश्चिम महाराष्ट्र

राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर "फिनिक्‍स'ची बाजी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धेच्या येथील केंद्रावर फिनिक्‍स क्रिएशन्सने बाजी मारली. या टीमने सादर केलेल्या "ह्येच्या आईचा वग' नाटकाने वैयक्तिक तीन बक्षीसांसह पहिल्या क्रमांकावर मोहोर उमटवली. इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेच्या "हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ' या नाटकाने दुसरा क्रमांक पटकावला. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. येथील रूद्रांश ऍकॅडमीच्या "मोठ्यांचा शेक्‍सपियर' या नाटकाने तिसरा क्रमांक पटकावला. 

दरम्यान, त्यांना अनुक्रमे चाळीस हजार, तीस हजार, वीस हजार अशी पारितोषिके मिळतील. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पंधरा नोव्हेंबर ते तेरा डिसेंबर दरम्यान स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगली. एकूण 28 प्रयोग स्पर्धेत सादर झाले. प्रा. मधु जाधव, मुकुंद हिंगणे, गौरी लोंढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा... 

0 दिग्दर्शन ः संजय मोहिते (ह्येच्या आईचा वग), अनिरूध्द दांडेकर (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ). 
0 प्रकाश योजना ः विनायक रानभरे (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ), तेजस कोळी (मोठ्यांचा शेक्‍सपियर). 
0 नेपथ्य ः अमोल नाईक (ह्येच्या आईचा वग), प्रविण लायकर (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ). 
0 रंगभूषा ः ओंकार पाटील (तुघलक, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग), सुनिता वर्मा (युध्द नको मज बुध्द हवा, निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी). 
0 उत्कृष्ट अभिनय रौप्यपदके ः सचिन वाडकर (ह्येच्या आईचा वग), कादंबरी माळी (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ). 
0 अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे ः तेजस्विनी सोनसाळे (वृंदावन, वरेरकर नाट्यसंस्था, बेळगाव), प्रतिक्षा गवस (पुरूष, सुगुण नाट्य संस्था, कोल्हापूर), वैदेही सावंत (नटरंग, वसुंधरा संस्था, कोल्हापूर), पूर्वा कोडोलीकर (ऐश्‍वर्या ब्युटी पार्लर, भारतवीर मंडळ, कोल्हापूर), उज्वला खांडेकर-शहा (ऊन-पाऊस, गानकोकिळा कान्होपात्रा किणीकर स्मृती संस्था, कोल्हापूर), परसु गावडे (विच्छा माझी पुरी करा, साई नाट्यधारा मंडळ, हलकर्णी), युवराज केळुस्कर (तुघलक), निहाल रूकडीकर (मोठ्यांचा शेक्‍सपियर), रोहित पोतनीस (अंदाधुंद, परिवर्तन फाऊंडेशन, कोल्हापूर), सतीश तांदळे (देव हरवला, देवल क्‍लब, कोल्हापूर). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

Yavatmal: महसूल मंत्र्यांनी घेतला ‘एसडीओं‘चा क्लास, मिटींगमध्ये बिघडली अधिकाऱ्याची प्रकृती; रुग्णालयात उपचार सुरू

Chandrapur: लाच घेताना दुय्यम निबंधक, ऑपरेटर अटकेत

SCROLL FOR NEXT