Pits on the streets of Mangalveda taluka 
पश्चिम महाराष्ट्र

दोन आमदार तरीही या तालुक्‍यातील रस्त्यांची दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे. पाच वर्षांच्या काळात आमदार भारत भालके व आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्‍यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला. परंतु, उपलब्ध निधी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्कररीत्या वापरण्याचा सपाटा लावला आहे.

ग्रामीण भागातून तक्रारीचा सूर मोठ्या प्रमाणात सुरू असून बांधकाम विभाग या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. 

खड्डे चुकवताना दुचाकीस्वाराला त्रास
महामार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गासाठी लागणारा कच्चा माल ग्रामीण भागातून एकत्रित केला जात आहे. त्यासाठी अवजड वाहनेही या रस्त्यावरून गेल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले. तर, काही ठिकाणी सुरू असलेली दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहेत. खड्डे चुकवताना दुचाकीस्वाराला त्रास होत असल्याने भाळवणी, निंबोणीच्या वाहनधारकांनी मार्गात बदल केला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. सध्या ठेकेदाराच्या माध्यमातून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी अधिकारी नसल्याने ठेकेदाराच्या सोयीनुसार रस्त्याचे काम होत असल्याच्या तक्रारी चिक्कलगी येथील नागरिकांनी व्यक्त केल्या. 

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते 
भोसे ते वाणीचिंचाळे, निंबोणी- जित्ती- मरवडे, पाटखळ- हाजापूर- भाळवणी- तळसंगी, लक्ष्मीदहिवडी-आंधळगाव - पाटखळ, बाळू - मन्याचीवाडी - हुन्नूर-मारोळी-लवंगी, लवंगी-सलगर बुद्रूक- शिवनगी, निंबोणी- चिक्कलगी - शिरनांदगी, ममदाबाद-लोणार, नंदेश्‍वर- भोसे- हुन्नूर- सोन्याळ, हुलजंती- पौट, निंबोणी-नंदेश्‍वर, गुंजेगाव-लक्ष्मीदहिवडी, धर्मगाव-मल्लेवाडी-मारापूर, बोराळे-अरळी, बोराळे-सिद्धापूर-वडापूर, भालेवाडी-डोणज-नंदूर, मंगळवेढा- हाजापूर-रड्डे, रड्डे ते शिरनांदगी, पाटखळ-नंदेश्‍वर, नंदेश्‍वर-गोणेवाडी- लेंडवेचिंचाळे, नंदेश्‍वर- भोसे, मंगळवेढा- खोमनाळ- निंबोणी. 

संबंधित विभागाचा निष्काळजीपणा
निंबोणी-रड्डे रस्त्याची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली. याबाबत विचारणा केल्यावर योग्य उत्तर दिले जात नाही. माझ्यासारख्या दिव्यांगाला या रस्त्यावरून जाता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या निष्काळजीपणा विरोधात मंत्री आमदार बच्चू कडू यांच्याकडे दाद मागणार आहे. 
- दिलीप खांडेकर, रड्डे 

तक्रारप्राप्त रस्त्याच्या कामाची पाहणी करून काम चांगले करून घेतले जाईल. याबाबत उद्या कामाची पाहणी करणार आहे. 
- बाबूराव राठोड, 
सहायक अभियंता, मंगळवेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT