Planet Earth launches survey; appeals to all 
पश्चिम महाराष्ट्र

"प्लॅनेट अर्थ'तर्फे यांचे सर्वेक्षण सुरु; सर्वांना आवाहन

सकाळवृत्तसेवा

शिराळा : सांगली जिल्ह्यातील पलूस, इस्लामपूर, कडेगाव व शिराळा परिसरात "प्लॅनेट अर्थ फाउंडेशन'च्यातीने पावसाळी जैवविविधता सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, त्यासाठी आपणाला आढळणाऱ्या जैव विविधतेची माहिती संस्थेला कळवावी, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांनी केले आहे. 

यावेळी ते म्हणाले, दरवर्षीप्रमाणे पावसाळा सुरू होताच त्यासोबत निसर्गामध्ये जैवविविधतेची मुक्तहस्ताने उधळण सुरू होते. यामध्ये विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, बेडूक, तने, रानभाज्या, पक्षी, मासे, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, यांची वर्षभर न दिसणारी विविधता दृष्टीस पडते. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणची जैवविविधता ही, कमी पावसाचे प्रमाण असलेल्या ठिकाणी पेक्षा वेगळी आढळून येते. म्हणूनच पावसाळ्यात आढळून येणारा या जैवविविधतेची नोंद असणे गरजेचे आहे. जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या महाराष्ट्र राज्य लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये, प्लॅनेट अर्थ फाउंडेशन मार्फत जिल्ह्यातील शिराळा, पलूस, कडेगाव आणि इस्लामपूर या नागरी भागात नोंदी करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

या परिसरातील जैवविविधते बद्दल भविष्यात कोणतेही नवीन संशोधन झाल्यास त्याचा फायदा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला होणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी भागातील ओढे, तळी, नद्या, मंदिरे, परसबागा, विहिरी, पूल, शेती, माळराने, वने अशा ठिकाणी फिरून निसर्ग अभ्यासकद्वारे, शास्त्रीय पद्धतीने या नोंदी केल्या जात आहेत. या जैवविविधता नोंदवहीमध्ये लोकांचे पारंपरिक ज्ञान, चालीरिती, औषधी वनस्पती, पिकांची जुनी वाण, जुने वृक्ष, प्राण्यांचे अधिवास, जलचर जैवविविधता इत्यादी सर्व प्रकारची विविधता नोंद करण्यात येत आहेत. 

या नोंदी करत असताना परिसरातील कृषी विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, नगरसेवक, पर्यावरण मंडळे इत्यादींशी फोनद्वारे संपर्क साधला जाणार आहे. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे, गुगल अर्थ, जीआयएस, जीपीएस, सॅटेलाईट द्वारे परिसराचे अध्ययन होत आहे. आपल्या गावचे वेगळेपण जपण्यासाठी परिसरातील समाजसेवकांनी, पर्यावरणप्रेमी, नगरसेवक, शिक्षक, सर्पमित्र, निसर्ग फोटोग्राफर, ट्रेकिंगचे ग्रुप यांनी स्वतः कडे असलेली नाविन्यपूर्ण माहिती प्लॅनेट अर्थ फाउंडेशनकडे कळवावी, असे आवाहन संस्थेच्या सदस्या आणि सल्लागार डॉ. शिल्पा कुरणे यांनी केली आहे. जैवविविधता नोंदवही तयार करण्याचे काम प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT