plastic roads in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत आता प्लास्टिकचे रस्ते...

सकाळवृत्तसेवा

सांगली ः सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून डांबरीकरणात प्लास्टीक मिसळून करून पहिला रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे डांबरी रस्त्यांचे आयुष्यमान वाढण्याबरोबर रस्त्यांचा दर्जाही चांगला राहणार आहे.

महापालिका क्षेत्रात यापुढे डांबरी रस्ते कामात प्लास्टिक वापरून रस्ते दर्जदार बनवण्याबाबत आयुक्त कापडणीस यांनी बांधकाम, आरोग्य विभागाला सूचित केले होते. त्यानुसार मनपाकडे गोळा झालेले प्लास्टिक सॅगरिकेट करून ते डांबरत्त समाविष्ट करून रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यानुसार आज शहरातील महाराष्ट्र हौसिंग सोसायटी भागात डांबरी रस्त्याच्या कामात 100 किलो प्लास्टीकचा वापर 
करून रस्ता तयार करण्यात आला.

या कामाच्या दर्जाची पाहणी मनपाचे अभियंता अशोक कुंभार आणि स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी केली. प्लास्टिकचा समावेश करून रस्ता दर्जेदार झाला आहे. यापुढेही प्लास्टिकचा वापर करून रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यामुळे मनपा क्षेत्रात रोज गोळा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे, असे श्री. कापडणीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT