chess.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आर्मेनिया देशातील ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा सांगलीतून... देशानंतर सांगलीचा सातासमुद्रापार लौकीक 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  बुद्धिबळाच्या ऑनलाईन पटावर स्पर्धा घेण्यात संपूर्ण देशात आघाडीवर असलेल्या बुद्धिबळपंढरी सांगलीला आणखी एक बहुमान मिळाला आहे. सातासमुद्रापार असलेल्या आशिया आणि युरोपच्या वेशीवरील आर्मेनिया देशातील खेळाडूंनी ऑनलाईन स्पर्धेसाठी सांगलीची मदत मागितली आहे. नेटके संयोजन पाहून सांगलीच्या पुरोहित चेस ऍकॅडमीकडे ही स्पर्धा आली आहे. या निमित्ताने सांगलीचा लौकीक सातासमुद्रापार पोहोचल्याची पोहोचपावतीच मिळाली आहे. 

गेली 50 वर्षेहून अधिक काळ सांगलीत बुद्धिबळ महोत्सव घेतला जात असून बुद्धिबळपंढरी म्हणून सांगलीचा लौकीक सर्वत्र आहे. प्रत्येक वर्षी देशभरातून या महोत्सवात मानांकित खेळाडू सहभागी होत असतात. यंदा कोरोनामुळे बुद्धिबळ स्पर्धा घेण्यावर बंधने आली आहेत. मात्र या काळात एकमेव ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहेत. ऑनलाईन स्पर्धा घेण्यात सांगलीकरांनी देशभरात दबदबा निर्माण केला आहे. सध्या सांगलीतून गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यातील स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्यामध्ये जवळपास 165 ते 170 देशातील मानांकित खेळाडू सहभागी होतात. 
ऑनलाईन बुद्धिबळ पटावर स्पर्धा घेण्यातील सांगलीचे नेटके संयोजन पाहून आर्मेनिया देशाने देखील सांगलीला निमंत्रण दिले आहे. आर्मेनियाचा फिडेमास्टर सर्गिस मनुक्‍यान याने त्याच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन खुली बुद्धिबळ स्पर्धा घेण्यासाठी पुरोहित चेस ऍकॅडमीचे सहकार्य मागितले आहे. 

6 डिसेंबर रोजी अरेना पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाणार आहे. पहिल्या फेरीस भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरवात होईल. आर्मेनियातील साको चेस क्‍लब येरेवन यांच्यामार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असल्याची माहिती बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस पुरोहित यांनी दिली. प्रशिक्षक सारंग पुरोहित, फिडे पंच दीपक वायचळ, चंद्रशेखर कोरवी आणि शार्दूल तपासे यांच्या सहकार्याने स्पर्धा होत असल्याचेही श्री. पुरोहित यांनी सांगितले. 

आर्मेनिया देशाची माहिती- 
आर्मेनिया हा देश काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राजवळील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागात आहे. डोंगराळ प्रदेशात हा देश आहे. थोडक्‍यात युरोप व पश्‍चिम आशियाच्या उंबरठ्यावरील या देशाची सीमा आहे. तेथे बुद्धिबळ देखील लोकप्रिय खेळ आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT