Police arrest gang for robbery 
पश्चिम महाराष्ट्र

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा

नगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ दरोड्याच्या तयारीतील इराणी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने काल (बुधवारी) सायंकाळी पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह दरोड्याचे साहित्य जप्त केले.

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. 


राजेश बबन देशमुख (रा. राहुरी), कंवर रहीम मिर्झा (रा. श्रीरामपूर), जाफर मुक्तार शेख (श्रीरामपूर), जाकीर ऊर्फ जग्ग्या युनूस खान (श्रीरामपूर) व अनिल रावसाहेब चव्हाण (राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. 

सावेडी, बोल्हेगाव उपनगरात काही दिवसांपासून घरफोडी व रस्तालुटीच्या घटना वाढल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना कॉटेज कॉर्नरकडून मोटारीतून काही लोक दरोड्याच्या उद्देशाने हत्यारासह भिस्तबाग महालाकडे येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने भिस्तबाग महालाजवळ सापळा रचला. बुधवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी हात दाखवून मोटार थांबविली.

पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारीसह सत्तूर, चाकू, लाकडी दांडके, असा एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कंवर रहीम मिर्झा, जाकीर ऊर्फ जग्या युसूफ खान, जफर मुख्तार शेख यांच्याविरुद्ध पुणे, नाशिक, धुळे, दिल्ली, गुजरात राज्यात विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. 


पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिरीष देशमुख, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, पोलिस नाईक सुरेश माळी, रणजित जाधव, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

५०० हून जास्त विकेट्स, पण मानसिक आरोग्याशी संघर्ष! इंग्लंडच्या ३२ वर्षीय खेळाडूने घेतली धक्कादायक निवृत्ती

Mumbai News: आदिवासी विद्यार्थी राज्यपाल भवनावर धडकणार, पोलिसांचा बंदोबस्त तैनात; कारण काय?

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Numerology: पैसा-अडका असला तरी दिखावा नाही! साधं जगणं पसंत करतात ‘या’ ३ मूलांकाचे लोक; स्वभाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT