A police complaint was registered against the fire brigade at the police station 
पश्चिम महाराष्ट्र

अग्निशामक दलाच्या जवानांविरोधातच पोलिसात गेल्या तक्रारीच्या ज्वाळा...

सकाळ वृत्तसेवा

हुक्केरी (बेळगाव) - येथील जुन्या बसस्थानक परिसरातील इलेक्‍ट्रॉनिक व चप्पलाच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. ही घटना शनिवारी (ता.11) दुपारी दोन वाजता घडली. त्यात लाखो रूपयांचे साहित्य खाक झाले. अग्निशामक दलाचे जवान बंबासह येण्यास विलंब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथील जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या सदानंद नानाप्पा मगदूम (रा.घोडगेरी, ता.हुक्केरी) यांच्या इलेक्‍ट्रॉनिक दुकानाला व बहुराज पांडुरंग कांबळे यांच्या चप्पलच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली.

अग्निशामक दलाच्या जवानांविरोधातच तक्रार

आगीची घटना लक्षात येताच हाकेच्या अंतरावरील हुक्केरीच्या अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला. पण तास उलटून गेला तरी, अग्निशामक बंब दाखल झाला नाही. उशिरा बंबासह अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी आग नियंत्रणात आणली होती. दरम्यान, नागरिकांनी अग्निशामक दलाच्या जवानांविरोधात हुक्केरी पोलिस ठाण्यात सामूहिक तक्रार दाखल केली. हिराशुगरच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. पण सदानंद मगदूम यांच्या इलेक्‍ट्रीक दुकानातील विद्युत पंखे, मिक्‍सर ग्राईंडर, स्वीच, इलेक्‍ट्रीक साहित्यासह फर्निचरचे मोठे नुकसान झाले. कांबळे यांच्या दुकानातील चप्पलांसह साहित्यही खाक झाले. हुक्केरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. अग्निशामक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून अग्निशामक दलाला येण्यास विलंब का झाला, याचा तपास सुरू आहे. 

जवान उशिरा दाखल झाले तसेच ते मद्यपान करून आल्याचा संशय आल्याने त्यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली. तालुका प्रशासनातील अधिकारीही न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने घटनास्थळी मंडल पोलिस निरीक्षक गुरूराज कल्याणशेट्टी यांनी भेट दिली.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT