पश्चिम महाराष्ट्र

हलगर्जीपणा भोवला; डॉ. महेश जाधवला सात दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना (covid 19)रुग्णांवर बेजबाबदारपणे उपचार करून त्यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशयावरून ॲपेक्स हॉस्पिटलचे(Apex Hospital)डॉ. महेश भीमसेन जाधव (mahesh jadhav)याला काल अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.police-custody-to-dr-mahesh-jadhav-covid-19-update-marathi-news

पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी माहिती दिली, की कोरोना रुग्णांवर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या. तक्रारींस अनुसरून महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात रुग्णालयाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच गुन्ह्याचा तपास करताना रुग्णालयातील काही रुग्णांच्या उपचारांसदर्भातील कागदपत्रेही तपासली. ज्यात बेजबाबदारपणा उघडकीस आला. पोलिसांनी रुग्णालयातील अनेक कर्मचारी, परिचारक आणि डॉक्टरांकडे चौकशी केल्यानंतर व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा स्पष्ट झाला.

पोलिसांनी रुग्णालयातील सौरभ शशिकांत स्वामी, काजल महादेव जाधव, रोहित राजेंद्र सावंत, जमीर अझरुद्दीन तांबोळी, कृष्णा शिंदे, डॉ. प्रियांका सकरे, ऋषभ भिलारे आणि शुभम जाधव यांना अटक केली. सर्वांकडे केलेल्या चौकशीतही रुग्णालयातील अनेक त्रुटी उघड झाल्याने रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ. महेश जाधव याच्याविरुद्ध कोरोना रुग्णांवर निष्काळजी आणि हलगर्जीपणाने उपचार करून मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरुद्ध केवळ शासनाच्या मार्गदर्शक सूचना, उपचार प्रणालीचा भंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता; परंतु मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रकरणांत गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. जाधव याने पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने ही विनंती फेटाळल्यानंतर डॉ. जाधव पुण्याकडे जात असतानाच कासेगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पकडले, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. डॉ. जाधव यांना ताब्यात घेऊन मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात आणले. सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT