Police here four days on duty 24 hours 
पश्चिम महाराष्ट्र

इथले पोलिस चार दिवस ऑन ड्युटी 24 तास... का?

शिवाजीराव चौगुले

शिराळा (जि. सांगली) : कोरोनामुळे सर्वत्र संचार बंदी लागू केल्याने पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी सतत तैनात आहे. अशा परिस्थितीत शिराळा तालुक्‍यात चार दिवसांत दोन खून झाल्याने शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस चार दिवस ऑन ड्युटी 24 तास असल्याने कर्तव्य बजावताना त्यांना रात्र झालीच नाही. त्यांच्या या सलग ऑन ड्युटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोनामुळे संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गावोगावी व मुख्य रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निगडी येथे दोन कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे त्या गावात विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास 12 पोलिस त्या ठिकाणी कार्यरत आहेत. प्रत्येक गावात फिरती करावी लागत आहे. या बंदोबस्तात व्यस्त असताना शनिवारी निगडी येथे दुपारी बाळू घाटके याचा खून झाला. खुनी संशयित आरोपी शंकर तटले हा फरार झाला. त्यामुळे त्याचा शोध शनिवारी रात्रीपासून सुरू झाला. तो रविवारी रात्री सापडला.

मंगळवारी कांदे येथे तुकाराम कुंभार यांचा खून झाला. हे मंगळवारी रात्री निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा रात्रभर तपास यंत्रणा सुरू झाली. चार दिवसांत दोन खून व कोरोना बंदोबस्त यामुळे पोलिस यंत्रणा कमी पडू लागली आहे. निगडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12 लोक, तहसील कार्यालय, विविध ठिकाणी असणारे चेक पोस्ट, शिराळा येथे दोन ठिकाणी असलेले क्वारंटाईन कक्ष, पोलिस ठाण्यात विविध विभागांत लागणारे कर्मचारी. दोन ठिकाणी झालेल्या खुनासाठी लागणारी तपास यंत्रणा या सर्वांसाठी मनुष्यबळ कमी पडू लागले. यामुळे सर्वांना ऑन ड्युटी 24 तास राहण्याची वेळ आली.

मात्र, या सर्व परिस्थितीवर सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कर्मचारी आपले कर्तव्य व्यवस्थित बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Gas Shortage: केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

SCROLL FOR NEXT