कवठेमहांकाळ : जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना गावोगावी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्या आहेत. समितीच्या माध्यमातून गावस्तरावरील कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. प्रशासनाकडून विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी कारवाई सुरू आहे. दुसरीकडे पोलिस खात्याबरोबर पोलिस पाटील व पोलिस मित्रानी मदतीसाठी कंबर कसली आहे. गाव स्तरावरील महसूल व पोलिस प्रशासनाचा दुवा असलेल्या पोलिस पाटील यांनी गावात परदेशातून तसेच राज्यातून आलेल्या नागरिकावर लक्ष ठेवले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात 60 गावांचा समावेश असून बहुतेक सर्वच गावात पोलिस पाटील यांची नेमणूक आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरावर राज्यातून तसेच परदेशातून येणाऱ्या व्यक्तीवर पोलिस पाटील यांची देखरेख होती. यातच गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्याने गावांमध्ये व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती वरिष्ठ कार्यालयातून मिळू लागली.
तहसीलदार बी. जे. गोरे,पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यानी नागरिकांनी संचारबंदीच्या काळात बाहेर पडू नये. घरीच रहा सुरक्षित राहाल असे आवाहन केले आहे. एकीकडे प्रशासनाने आवाहन केले असताना दुसरीकडे पोलिस प्रशासनाने तालुक्यात नागज फाटा, लोणारवाडी,सलगरे, खरशिंग फाटा, शिरढोण येथे चोख बंदोबस्त लावला आहे. पोलिस खात्याच्या मदतीला गावा गावातील पोलिस पाटील मदत करीत आहेत. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तालुक्यात गावातील पोलिस मित्रांची नेमणूक केली.
मदतीसाठी हात सरसावले
तालुक्यात पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिसांनी बरोबरच पोलिस पाटील पोलिस मित्रही आहेत. पोलिसांना दिवसभर बंदोबस्त असल्याने त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणीच जेवण पण मिळावे या हेतूने काही व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. शुक्रवारी अष्टविनायक पतसंस्था व विशाल दादा पाटील प्रतिष्ठानतर्फे मोफत सॅनिटायझर दिले. उदय शिंदे, अय्याज मुल्ला व दिनेश जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना जेवणाची पार्सल पोलिस ठाण्यात दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.