Police suicide 
पश्चिम महाराष्ट्र

गळफास घेऊन पोलिसाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी परिसरातील पोलिस शिपाई बापूसाहेब कारभारी रणनवरे (वय 48) यांनी घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवारी) सायंकाळी घडली. 

रणनवरे नेवासे ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांनी टाकळीभान येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक मसूद खान यांनी दिली. 

रणनवरे यांच्या पत्नी व मुलगे बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसताना त्यांनी गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या पुतण्यांच्या लक्षात आला. त्यांनी शेजारील लखन खरात यांना ही माहिती दिली.

अकस्मात मृत्यूची नाेंद

ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देऊन मृतदेह साखर कामगार रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रणनवरे मृत असल्याचे घोषित केले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक खान यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

Mumbai Pune Expressway Accident : अखेर द्रुतगती मार्गावरील‘महाकोंडी’ सुटली, तब्बल ४४ तासांनंतर वाहतूक पूर्वपदावर; बोरघाटातील अडथळा दूर

Pariksha Pe Charcha 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार 'परीक्षा पे चर्चा', परीक्षेतील ताण कमी करण्यासाठी विद्यार्थांशी साधणार संवाद

SCROLL FOR NEXT