Police will get insurance of Rs 20 lakh in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिसांना मिळणार आता २० लाखांचा विमा

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सेवेवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये विम्याच्या स्वरुपात मिळणार आहेत. विमा कंपन्यांकडून २० लाख रुपयांचा विशेष संघ विमा (ग्रुप इन्शुरन्स) मंजूर करून घेण्याचे आदेश पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी बजावले आहेत. यासह सेवेवर निधन झालेल्या पोलिसांची माहिती सात दिवसांच्या आत विमा कंपन्यांना न कळविल्यास संबंधित अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार ठरविले जाईल, असेही बजावले आहे.


राज्य पोलिस दलाने ग्रुप इन्शुरन्ससाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीलाच कायम ठेवले आहे. महिनाभरात कंपनीने मृत्यू पावलेल्या पोलिसाच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम अदा करणे आवश्‍यक आहे. यासह नैसर्गिक आजार, हृदयविकार, आत्महत्या आदी कारणांमुळे मृत्यू झाल्यास ही विमा सुविधा मिळणार नाही. ज्या ठाण्यातील कर्मचाऱ्याचा सेवेवर मृत्यू होईल, त्या ठाण्याचे निरीक्षक, संबंधित विभागाचे उपअधीक्षक यांनी सात दिवसांच्या आत ही माहिती विमा कंपनीला देणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. तसेच कंपनीनेही महिनाभरात मृत पोलिसाच्या कुटुंबाला विमा रक्कम अदा करावी लागेल.

पोलिसाचा सेवेवर मृत्यू झाल्यास सेवा पुस्तक, ठाणाधिकाऱ्याकडून विमा रक्कम कुणाच्या नावे दिली जावी याबाबतचे पत्र, एनपीएस आदेश पत्र, एफआयआर, शवचिकित्सा अहवाल, सेवारत मृत्यू झाल्याबाबतचे वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातमीचे कात्रण, कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड, बॅंक खाते आदी सर्व माहिती विमा सुविधा घेण्यापूर्वी कुटुंबाला तसेच पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना विमा कंपनीला पुरवावी लागणार आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT