पश्चिम महाराष्ट्र

मॉर्निंग वॉकवाल्यांचा आज न्यायालयात फैसला

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. लोकांनी घरीच राहावे, यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. असे असतानाही अनेक लोक मॉर्निंग वॉकलाही बाहेर पडत असल्याचे दिसत होते. त्याविरोधात साेमवारी ता.6 पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहर व परिसरातील मॉर्निंग वॉकला गेलेल्या तब्बल 76 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अचानक मोठी कारवाई करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली असून, शहर व परिसरात हा चर्चेचाच विषय झाला आहे.
 
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकांनी घरीच राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात 14 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. मात्र, तरीही त्याला डावलून आणि सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद न देता दररोज विनाकारण बाहेर जाणे सुरूच ठेवले आहे. कऱ्हाड शहर व परिसरासह तालुक्‍यात अनेक ठिकाणावरून आतापर्यंत अशा विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींवर कारवाई करून तब्बल 300 वर दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर अजूनही त्याची कार्यवाही सुरूच आहे. संबंधितांना लॉकडाऊन संपल्यानंतर दंड भरून दुचाकी ताब्यात देण्यात येणार आहेत. एकीकडे ही कारवाई सुरू असतानाच अनेकांनी पहाटे मॉर्निंग वॉकला जाणे सुरूच ठेवले होते.

त्याची दखल घेऊन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी अशा मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्यांवर आज कारवाईची मोहिम राबवली. त्याअंतर्गत सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, राहुल वरोटे, अमित बाबर, पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे, सहायक फौजदार राजेंद्र पुजारी, प्रदीप कदम, दीपक साळुंखे, हवालदार खलील इनामदार, अप्पासाहेब ओंबासे, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे व सहकाऱ्यांनी शहरातील वाखाण रस्ता, छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसर, शहरातील मुख्य रस्ता, विद्यानगर, ओगलेवाडी, मलकापूर, आगाशीवनगर, बनवडी, कार्वेनाका परिसरात स्वतंत्र पोलिसांच्या पथकाने ही मोहीम राबवून तब्बल 76 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना शहर पोलिस ठाण्यापासून न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाला सुटी असल्याने संबंधितांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी दिली. 

...आता कोणाची खैर नाही 

शहर व परिसरात पोलिस अहोरात्र शहरातील आबालवृद्धांचा सुरक्षेसाठी तैनात आहेत. लोकांना सरकारने केलेल्या आवाहनाचे लोकांनी पालन करून घरी बसणे आवश्‍यक आहे. लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. मात्र, अजूनही काही जण विनाकारण फिरताना, औषधांच्या खोट्या फाइल घेऊन फिरताना, मॉर्निंग वॉकला जाताना दिसत आहेत. हे बरोबर नाही. पोलिस विनाकारण कारवाई करत नाहीत. मात्र, प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिला आहे. 

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT