Politics 
पश्चिम महाराष्ट्र

खुर्ची नव्हे ‘टेबला’साठी रस्सीखेच!

शैलेन्द्र पाटील

सातारा - राजकारणात आणि प्रशासनात खुर्चीसाठी चढाओढ लागल्याची उदाहरणे अनेक पाहण्यात आली असतील. परंतु, ‘टेबला’साठीची स्पर्धा अपवादाने घडते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही महिन्यांपासून एक स्पर्धा सुरू आहे आणि ती म्हणजे विशिष्ट टेबल मिळविण्यासाठी! वरिष्ठांच्या खुर्चीत बसलेले अधिकारीही या स्पर्धेने वैतागले आहेत. या टेबलावरून गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांचा त्रयस्त एजन्सीमार्फत फेरआढावा घेतल्यास प्राधिकरणाच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होईल, असा अंदाज आहे. 

राजकारणात खुर्ची मिळविण्यासाठीच्या स्पर्धेचे किस्से अनेक आहेत. प्रशासनातही वरिष्ठाची खुर्ची मिळविण्यासाठी काय काय केले जाते. परंतु, साताऱ्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात सध्या विशिष्ट ‘टेबल’ मिळविण्यासाठी सुरू असलेल्या चढाओढीची मोठी चर्चा आहे.

महाराष्ट्र पोलिस सेवेत जशी हायवे ट्रॅफिकची पोस्टिंग अनेकांना हवीहवीशी वाटते तसे, जीवन प्राधिकरणातील एकाचे टेबल त्याच कार्यालयातील अनेकांना हवेहवेसे वाटते. गेल्या काही महिन्यांपासून एक कारकून हे टेबल ‘सांभाळतोय’. या टेबलाचा चार- पाच वर्षांचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या दुसऱ्या कारकुनाने या टेबलावर पुन्हा दावा सांगितल्याने वादाला कारण ठरले आहे. 

सध्याच्या कारकुनाचे टेबल काढून घेण्यासाठी दुसऱ्याने थेट मुंबईतून दूरध्वनी आणला. ‘पीए’ साहेबांनी दोन-तीन दूरध्वनी खर्ची घातले. ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत सध्या त्या जागेवर असलेल्या कारकुनाने ‘थेट’ वशिला आणल्याची चर्चा आहे. ‘पीए’ साहेबांचे ऐकायचे की ‘थेट’ साहेबांचे, असा प्रश्‍न वरिष्ठांच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याला पडला. ‘एकीकडे आड तर दुसरीकडे मोठ्ठं तळे’ असल्याने दोलायमान स्थितीत असलेल्या या अधिकाऱ्याने स्वत:चा मोबाईलच काही दिवस बंद करून ठेवला होता. आता परवा-परवा वरिष्ठांकडे तक्रारी झाल्याने त्यांना मोबाईल सुरू करावा लागल्याचे समजते. अजूनही गुत्ता सुटलेला नाही!

काय आहे टेबलाचे रहस्य! 
तांत्रिक अनुभवाच्या जोरावर निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे काम या टेबलावरील माणसाचे आहे. तसे हे जबाबदारीचे टेबल! कारकुनाऐवजी तांत्रिक अनुभव असलेल्या एखाद्या शाखा अभियंत्याच्या निगराणीत हे टेबल असले पाहिजे, अशी धारणा आहे. पण, निव्वळ कारकुनाकडे टेबल दिल्याने ‘बाजार’ झाल्याचे सांगण्यात येते. त्यात अपार्टमेंटचा नवा नियम पथ्यावर पडला असल्याने या टेबलाला सर्वाधिक मागणी आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT