Politics is playing Dr. Another surgery by Sujay Vikhe Patil
Politics is playing Dr. Another surgery by Sujay Vikhe Patil 
पश्चिम महाराष्ट्र

राजकारण हा खेळंय...रात्री सगळे एकच पक्षात, डॉ. सुजय विखे पाटलांकडून आणखी एक सर्जरी

मार्तंड बुचुडे

पारनेर ः डॉ. सुजय म्हणजे विखे पाटील घराण्यातील चौथी पिढी. समाजकारण, राजकारण,सहकार, साहित्य, क्रीडा, शेती असं सगळं बाळकडू ते प्यायलेत. ते बिनधास्तपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. काल त्यांनी असंच रोखठोक वक्तव्य करीत राजकारणाच्या खेळाची शस्त्रक्रिया केली.

वेगवेगळ्या पक्षातील राजकारणी मंडळी दिवसा कट्टर विरोधक असतात; मात्र रात्री कोण, कोठे एकत्र बसतात, हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे कोण-कोणत्या पक्षात आहे व पक्षनिष्ठा ही बाब गौण आहे. राजकारणात खऱ्या अर्थाने "रात्रीस खेळ चाले' अशी स्थिती आहे, असा गौप्यस्फोट खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. 

दैठणे गुंजाळ येथील सभामंडपाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""तालुक्‍यातील प्रत्येक गावात लवकरच शिबिर घेणार आहे. त्यात नागरिकांना विविध दाखले, कृषी योजना, पीकविमा, उत्पन्नाचे दाखले, जातीचा दाखला, रेशन कार्ड आदींची कामे केली जातील. मला कोणी मतदान केले, कोण कोणत्या पक्षाचा, याचा विचार न करता, सर्वांची कामे केली जातील. एक वेळ गावात रस्ता, सभामंडप झाला नाही, तरी चालेल; मात्र जीवनाशी निगडित दाखले मिळणे गरजेचे आहे.'' 

पक्षनिष्ठा निवडणुकीत ठेवा, बाकी हा खेळय

""पक्षनिष्ठा फक्त निवडणुकीपुरती असावी. मला मतदान करून चूक झाल्याची भावना कोणाचीही होऊ देणार नाही. पुढील काळात सर्वांची कामे करणार. विविध पक्षांचे कार्यकर्ते सतत भांडत असतात; मात्र वरचे नेतेमंडळी रात्री एकत्र येतात. राजकारणात कोण, कोणाला, कशी व कधी मदत करील, हे सांगता येत नाही. हा खेळ कसा चालतो, हे मी जवळून पाहिले आहे,'' असे डॉ. विखे पाटील म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT