Politics took place in the Pedgaon Society 
पश्चिम महाराष्ट्र

पेडगावात झाली गावगुंडी, सोसायटीच्या अध्यक्षांचे दहा दिवसांतच अधिकार काढले

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : निवडणूक होऊन महिनाही झाला नाही आणि अध्यक्षपद मिळाल्यानंतर झालेल्या मिरवणुकीचा गुलालही अंगावर तसाच आहे, तोच विश्वास दाखवणाऱ्या संचालकांनी गैरविश्वास दाखवून अवघ्या दहा दिवसांत सेवा संस्थेच्या अध्यक्षांच्या विरोधात ठराव करून त्यांचे सह्यांचे अधिकार काढले. पेडगाव (ता. श्रीगोंदे) येथील सेवा संस्थेत घडलेले हे राजकारण चर्चेत आले आहे.

 
पेडगाव सेवा संस्थेसाठी 2 फेब्रुवारीला मतदान झाले. अकरा सदस्य असणाऱ्या या संस्थेत राजकारण कमालीचे तापले होते. निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाचे रोहिदास पवार यांनी मोठ्या खुबीने बहुमत मिळविले. 18 फेब्रुवारी रोजी पवार यांना सहकारी सदस्यांनी विश्वासाने अध्यक्ष केले.

मिरवणुका झाल्या. गुलालाची उधळणही झाली. एकत्र कारभार करण्याच्या आणा-भाकाही घेतल्या गेल्या; मात्र माशी कोठे शिंकली समजलेच नाही आणि अवघ्या दहा दिवसांत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी उफाळली.

आज सत्ताधारी गटाने अध्यक्ष पवार यांच्या विरोधात अविश्वास दाखवत त्यांचे सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्यापुढे संमत करून घेतला.

सेवा संस्थेच्या निवडणुकांत वा कारभारात राजकारण आणू नये, हे संकेत पेडगावच्या संचालकांनी मात्र हवेत उडवून लावत दहाच दिवसांत अध्यक्षांना नामधारी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

Video : "पुढच्या जन्मी कॉर्पोरेट कामगार बनवू नको रे देवा"..धुरंधर-2 पाहत-पाहत लॅपटॉपवर ‘वर्क फ्रॉम थिएटर’! महिलेचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra fishing News: मच्छीमारांवर एक लाख रुपयांचा अतिरिक्त भार; डिझेल दरवाढीचा परिणाम, बोटी किनाऱ्यावरच उभ्या करण्याचा निर्णय!

Latest Marathi News Live Update : गॅसटंचाईवर पीएम मोदींचं संसदेत वक्तव्य; युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम

Dharashiv News: अवकाळीचा ७१ गावांना फटका, ९९८ हेक्टर रब्बी, ४०९ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान; दीड हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT