Pomegranate rate boom at Atpadi Market 
पश्चिम महाराष्ट्र

डाळिंब दराने घेतली उसळी; किलोला इतका मिळाला दर

नागेश गायकवाड

आटपाडी (जि . सांगली) : येथील बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळिंबाची आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे डाळिंब दराने मोठी उसळी घेतली. ग्रेड एकचा भाव प्रति किलो दीडशेच्या पुढे; तर ग्रेड चारला सर्वांत कमी पन्नास रुपये दर मिळाला. 

येथील डाळिंब सौदे बाजारात आटपाडी, कवठेमंकाळ, जत, सांगोला, माळशिरस, माण, खटाव या भागातून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी आणतात. गेल्या महिन्यात डाळिंबाची रोज 100 ते 120 टन आवक होत होती. या काळात 25 ते 70 रुपये दरम्यान दर होते. मात्र गेल्या आठवड्यापासून आवक घटत चालली आहे. 50 टक्‍क्‍यांनी आवक कमी झाली आहे; तर लॉकडाउन शिथिल केल्यामुळे मोठ्या शहरांतून डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. आवक कमी आणि मागणी जादा झाल्याचा परिणाम दरावर झाला आहे. 

येथे विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाची चार प्रकारात विभागणी केली जाते. पहिल्या प्रकाराला प्रतिकिलो दीडशे रुपये भाव मिळाला, तर सर्वात कमी दर्जाचा, अत्यंत लहान फळे असलेल्या चार क्रमांकाला पन्नास रुपय दर मिळाला. यामध्येही हरिओम फ्रुट सेंटरवर माळशिरस शेतकरी हणमंत गोरे यांनी विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला सर्वाधिक 157 रुपये प्रति किलो; तर ग्रेड 4 च्या डाळिंबाला 52 रुपये दर मिळाला. यावेळी हरिओम सेंटरचे मालक पांडुरंग सरगर यांनी हणमंत गोरे यांचा सत्कार केला. 

दर कायम राहतील

डाळिंब दरात प्रचंड वाढ झाली आहे.आवक कमी आणि मागणी जास्त झाल्याचा परिणाम आहे. असेच दर कायम राहतील असा अंदाज आहे. 
- पांडुरंग सरगर, संचालक, हरिओम फ्रूट सेंटर 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT