The ped is leaking due to poor workmanship of the tree  
पश्चिम महाराष्ट्र

पेड तलावाचे काम निकृष्ठ झाल्याने तलावाला गळती

शिवकुमार पाटील

पेड : येथील तलावातून पेड, मांजर्डे, मोराळे तसेच गौरगाव या गावातील शेतीला पाणी देण्यासाठी 14 कोटी रुपये खर्च करून बंदिस्त पाइपलाईनचे काम सुरू आहे. तलावातून मागील वर्षी पावसाळ्यात चर काढली आहे. त्याचे काम निकृष्ठ झाल्याने तलावाला गळती लागली आहे. लाखो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. 

ऐन उन्हाळ्यात पेडचा तलाव कोरडा पडू लागला आहे. लाभक्षेत्रातील शेकडो एकरातील द्राक्षे, ऊस व भाजीपाला ही पिके पाण्याअभावी धोक्‍यात आली आहेत. पाटबंधारे विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

तलावातून परिसरातील गावांना सायपनद्वारे बंदिस्त पाइपलाइनमधून शेतीला पाणी देण्यात येणार आहे. तलावाच्या मध्यातून बंदिस्त पाइपलाइनचे काम करण्यात आले. खोलपर्यंत पोकलॅनने चर काढण्यात आली. तलावातील चरीतून शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. ऐन उन्हाळ्यात तलाव कोरडा पडू लागलाय. 

तलाव सन 1972 मध्ये दुष्काळात रोजगार हमी योजनेतून बांधण्यात आला आहे. पाणीसाठवण क्षमता ही 55. 43 दशलक्ष घनफुट आहे. मात्र गळती लागल्याने व पाणी कापूर ओढ्याला वाहून गेल्याने तलाव रिकामा होत आला आहे. एक दोन महिन्यात तलाव पूर्ण कोरडा पडण्याचा धोका आहे. पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाने लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

नेत्यांचे मौन :
तलावात गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. लाखो लिटर पाणी वाया गेल्याने टंचाईचा सामना करावा लागण्याचा धोका आहे. विविध पक्षाची राजकीय नेतेमंडळी मात्र गप्प आहे. त्याबद्दल लोकांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT