The possibility of fraud by teachers during the holidays 
पश्चिम महाराष्ट्र

बी.एड.साठी गुरुजींकडून बनवाबनवी 

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेतील बी.एड., तसेच पदव्युत्तर पदवी करणाऱ्या काही शिक्षकांकडूनच बनवाबनवी केली जात आहे. रजा न घेताच ते दोन्हीकडे "हजर' असल्याचा चमत्कार करीत आहेत. त्यांच्याकडून होणारी ही धूळफेक शिक्षण विभागाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे या विभागाने सन 2001पासून चौकशी सुरू केली आहे. चौकशी झाल्यास शिक्षकांची "शाळा' उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. या कार्यवाहीमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

चौकशी होणार 
जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक शिक्षक नोकरी सांभाळून आपले पुढील शिक्षण करतात. हे शिक्षण बहिःस्थ व नियमित अशा दोन पद्धतीने घेतले जाते. बहिःस्थ प्रवेश घेणाऱ्यांना रजेची गरज भासत नाही. मात्र, नियमित शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना रजा अनिवार्य असते. मात्र, काहींनी रजा न घेताच शिक्षण पूर्ण केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाने बी.एड. व इतर शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांनी रजा किती घेतल्या? त्या रजांची नोंद सेवापुस्तकावर झाली आहे का? या संदर्भातील चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. शिक्षकांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे मागविण्यात येणार आहे. 

दोनशे दिवसांची उपस्थिती अनिवार्य 
बी.एड. व इतर पदवीचे नियमित शिक्षण घेत असताना महाविद्यालयामध्ये 70 ते 80 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे नियमित प्रवेश घेतलेल्यांना सुमारे 200 दिवस महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणे अनिवार्य असते. काहींची दोन्हीकडेही हजेरी आहे. गेल्या काही वर्षांपासून हा उपद्‌व्याप सुरू आहे. 

सुटीतही लबाडी 
शिक्षकांकडून दिवाळीच्या सुट्यांच्या काळात फसवणूक झाल्याची दाट शक्‍यता आहे. दिवाळीची सुटी लागण्यापूर्वी एक दिवस ते नेमणुकीच्या ठिकाणी हजर होतात. सुटी उपभोगल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहून नंतर जातात. हा फसवणुकीचा प्रकार आहे. शिक्षणासाठी रजा घेतल्यास ती सलगपणे घेणे आवश्‍यक असल्याचा नियम आहे. 

शिक्षक आणि शाळांची संख्या 
शाळांची संख्या ः 3575 
शिक्षकांची संख्या ः 11861 
बी.एड. करणारे एकूण शिक्षक ः 133 
रजा घेतलेले शिक्षक ः 125 
रजा न घेतलेले शिक्षक ः तीन 
अनियमित रजा घेतलेले शिक्षक ः पाच 

खुलासा मागविला 
जिल्ह्यात 135 जण नियमित शिक्षण घेत आहेत. या सर्वांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. तो आल्यानंतरच त्यावर कारवाई करण्यात येईल. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT