Postman 
पश्चिम महाराष्ट्र

लोकांच्या मनात आजही पोस्टमनदादा

जयभीम कांबळे

तळमावले - ब्रिटिश काळापासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोचलेले आहे. आजच्या एसएमएस, वॉट्‌सॲप, ई-मेलच्या जमान्यातही टपाल यंत्रणा अन्‌ पोस्टमनदादा आजही लोकांच्या मनात पाय रोवून उभे आहेत. टपाल खात्याची नियमितता, अचूकता, कार्यप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्ह आहे, यात लोकांच्या मनात कोणतीच शंका नाही. 

टपाल म्हटले की समोर उभा राहतो तो पोस्टमन. ऊन, पावसाची तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजनांनी पाठवलेले साधे पत्र असो वा स्पीडपोस्ट, रजिस्टर वा पार्सल... प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रामाणिकपणे पोचवतो तो पोस्टमनदादा... अशाच एका पोस्टमनदादाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पोस्टमनच्या कामाची व त्याला येणाऱ्या अडी-अडचणींची व्यथा मांडली.

तळमावल्यात गेली ३३ वर्षे पोस्टमनचे काम करून ड्यूटी बजावणारे संजय कांबळे हे गावातील प्रत्येक लोकांच्या मनात घर करून आहेत. सध्या ते कऱ्हाड येथील प्रधान डाकघरात सेवा बजावत आहेत. 

टपाल खाते हे ग्रामीण भागातील संपर्काचे महत्त्वाचे साधन आहे. आलेली पत्रे व द्यावयाची पत्रे लोकांना सुखरूप घरपोच करणे हे पोस्टमनचे काम असते. हे काम करताना खात्याकडून पावसाळ्यात छत्री, गमबूट मिळायचे... कांबळे जुन्या आठवणींना उजाळा देत होते. आज कामाचा बोजा जास्त असला तरी आपण एक राष्ट्रहिताचे काम करतोय, याचीही जाणीव त्यावेळी होती अन्‌ आजही आहे. हळूहळू पगार वाढत गेला अन्‌ कामही... पोस्टमनचे काम प्रामाणिकपणे करत राहिलो, असेही त्यांनी नमूद केले.

कोणतेही काम करा. पण, ते प्रामाणिकपणे करा. आपल्या कामातून समाजाचा आणि राष्ट्राचाही फायदा झाला पाहिजे.
- संजय कांबळे, कर्मचारी, टपाल विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT