पश्चिम महाराष्ट्र

जत्राट रोडवर औद्योगिक वसाहतीतील पॉवरलूम कारखान्याला आग; कारखाना आगीत भस्मसात

सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : जत्राट रोडवर (Jatrat Road)असलेल्या श्रीपेवाडी(shripewadi)येथील औद्योगिक वसाहतमधील पॉवरलूम टेक्सटाईल कारखान्याला(power loom factory industrial)बुधवारी(ता.2) रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत रमेश चव्हाण बंधूंचा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 7 कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दोन महिन्यात ही औद्योगिक वसाहत येथील आगीची दुसरी घटना आहे.लॉकडाऊनमुळे औद्योगिक वसाहत मधील सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे वसाहत परिसरात नागरिकांची वर्दळ नाही. या वसाहतीमध्ये असलेला रमेश चव्हाण बंधू यांचा गारमेंट कारखाना बंद होता.

बुधवारी मध्यरात्री अचानकपणे कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागली. ही आग धुमसत जाऊन पहाटेच्या सुमारास संपूर्ण कारखाना या आगीत जळून खाक झाला. ही घटना पहाटेच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आली. यावेळी परिसरातील काही कारखानदार व रहिवाशांनी याची माहिती कारखान्याचे मालक रमेश चव्हाण ( कोल्हापूर ) यांना दिली. चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी निपाणी येथील अग्निशमन विभागाने आग शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र , गुरुवारी (ता.3)सकाळपर्यंत ही आग धुमसत होती.

याबाबत अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ,

आगीच्या घटनेत कारखान्यातील सुमारे ५ कोटींची यंत्रसामग्री, तयार कापड व इतर साहित्य संपूर्ण जळून खाक झाले आहे . त्यामुळे सुमारे 7 कोटींची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.7) सकाळी ९ पर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशमन विभागाच्यावतीने सुरू होते. औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती घटना समजताच परिसरातील कारखानदार उद्योजकांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

SCROLL FOR NEXT