Pratik Patil Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Pratik Patil : जयंत पाटलांच्या मुलाची राजकारणात धडाक्यात एन्ट्री; 'या' कारखान्याचं जिंकलं संचालक पद

सकाळ डिजिटल टीम

Pratik Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाली आहे.

प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. हा विजय म्हणजे प्रतीक पाटील यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयं पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांचा अलीकडेच शाही विवाह पार पडला होता. या शाही विवाहाची राज्यभर एकच चर्चा झाली होती. या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत सर्वपक्षीय़ नेते उपस्थित राहिले होते.

दरम्यान, लग्नात सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करून आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच असल्याचे बोलेले गेले होते. त्यानंतर आता प्रतीक पाटलांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे

जयंत पाटलांनीदेखील केली होती अशीच एन्ट्री

स्वत: जयंत पाटील यांनीही त्यांच्या राजकीय क्षेत्रातील पदार्पण साखर कारखान्याच्या निवडणुकीतून केले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत प्रतीक पाटीलांची राजकारणात एन्ट्री झाल्याचे या विजयानंतर बोलले जात आहे.  

मागील काही काळापासून प्रतीक पाटलांच्या राजकीय लाँचिगसाठी जयंत पाटील तयारी करत असताना दिसून येत होते. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या संवाद यात्रेत प्रतीक पाटील यांचे डिजिटल पोस्टर असो किंवा पक्षाच्या विविध मोर्चात त्यांचा सहभाग, त्यांच्या शाही विवाहात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती ही त्यांच्या राजकीय प्रवेशाची चुणूकच असल्याचे दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT