Pravin-jadhav 
पश्चिम महाराष्ट्र

सरडेच्या प्रवीण जाधवचा ऑलिंपिकवेध

सिद्धार्थ लाटकर

सातारा - देशाला कुस्तीत पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, धावपटू ललिता बाबर यांच्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्याचा ऑलिंपिकमध्ये झेंडा रोवणारे प्रवीण रमेश जाधव हे तिसरे ऑलिंपिकपटू ठरणार आहेत. नेदरलॅंड येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत प्रवीण जाधव याने भारतीय तिरंदाज संघातील सहकारी अतानू दास, तरुणदीप राय यांच्यासह उत्तम कामगिरी करून टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमधील आपले स्थान निश्‍चित केले आहे. 

प्रवीणचा जन्म सरडे (ता. फलटण) येथील छोट्याशा गावात झाला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अंत्यत बेताची आहे. राहायला नीटसे घर नाही. उदरनिर्वाहासाठी आजही त्याचे कुटुंबीय मोलमजुरी करतात. या परिस्थितीत प्रवीणने तिरंदाजी खेळ प्रकारात प्रावीण्य मिळवून जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर राज्य शासनाने सन २०१७-१८ चे शिवछत्रपती पुरस्काराने त्याला गौरवले आहे. सरडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवीणने शिक्षण घेतले. भुजबळ गुरुजींनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने क्रीडा प्रबोधिनीतून यश मिळवले. अमरावती येथील शिक्षण संकुलात त्याने बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. यादरम्यान त्याने तिरंदाजीत प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चमक दाखविली. सहा ते सात वर्षे त्याने स्वतःला तिरंदाजीत सिद्ध केले. तिरंदाजीमधील  कौशल्याच्या जोरावर त्याने सैन्यदलात हवालदार पदावर नेमणूक मिळवली. सध्या तो घोरपडी येथील आर्मी सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. नेदरलॅंडमधील स्पर्धेनंतर प्रवीण पुढच्या महिन्यात जागतिक पोलिस दलाच्या स्पर्धा तसेच बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक तिरंदाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Nagar Panchayat : राज्यभर चर्चित अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश

Latest Marathi News Live Update : दहशतवाद्यांचा कट उधळला; दिल्ली पोलिसांकडून तीन जणांना तीन राज्यांतून अटक

Amravati News : निवडणुकीत झाला विजय! तांबट पक्षी झाला अमरावतीचा ‘सिटी बर्ड’; सहा पक्ष्यांमध्ये रंगला सामना

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार अन् ट्रकचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी; तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला

माेठी बातमी ! 'शहाजी पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी धाडी'; सांगोल्यात उडाली खळबळ; रात्री उशिरापर्यंत तपासणी

SCROLL FOR NEXT