चिक्कोडीत मतमोजणीची तयारी पूर्ण  sakal
पश्चिम महाराष्ट्र

चिक्कोडीत मतमोजणीची तयारी पूर्ण

आर. डी. कॉलेजवर आज मतमोजणी : नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : बेळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीतील दोन जागांसाठी शुक्रवारी (ता. १०) मतदान झाले. या निवडणुकीत कोण निवडून येणार, याची नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता शिगेला लागली असून त्यांचे भवितव्य मतपेटीतून आज (ता. १४) मतमोजणीतून उघडणार आहे. येथील आर. डी. कॉलेजमध्ये दोन स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या ठेवल्या असून त्याची तीन रूममध्ये मतमोजणी होणार आहे. चिक्कोडीत गेले चार दिवसापासून जिल्हा पोलिस प्रमुख आणि अधिकाऱ्यांनी वरचेवर येऊन पाहणी करून काटेकोरपणे पोलिस बंदोबस्त केला आहे. आज होणाऱ्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात सहा उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 511 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण ८ हजार आठशे 49 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक केंद्रावर काटेकोरपणे नियमाचे पालन, पोलिस बंदोबस्त, व्हिडिओ कॅमेरे, फोटोग्राफर, आशा कार्यकर्त्याकडून तपासणी केली जात होती. यावेळी नियम कडक असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार मतदान केंद्रात घडू नये, त्यासाठी पारदर्शकपणा राबिविले आहेत.

जिल्ह्यात दोन जागांसाठी निवडणूक झाली. भाजपकडून महांतेश कवटगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी हे प्रत्येकी एकच उमेदवार दिले होते. त्यांच्या जोडीला अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी यांनी निवडणूक लढविल्याने तिरंगी लढत लागली. आम आदमी पार्टीकडून शंकर हेगडे तर शंकर कुडसोमण्णावर आणि कमलेश गाणगी या आणखी दोन अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळ्या पेटल्या होत्या. अखेर आज मंगळवारी (ता. 14) कोणत्या उमेदवाराचे भविष्य उघडणार, याकडे बेळगाव जिल्ह्यातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना लक्ष लागून राहिले आहे.

मतमोजणीला किती वेळ लागणार हे निश्चित नाही

विधान परिषद मतमोजणी सकाळी 8 पासून आर. डी. कॉलेजमध्ये सुरू होणार आहे. कडक पोलिस बंदोबस्तात मतमोजणी तीन रूममध्ये होणार आहे. मत मोजणीला किती वेळ लागणार आहे, याची निश्चित वेळ सांगता येणार नाही असे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT