Prepare immediate proposals for manpower on contract basis 
पश्चिम महाराष्ट्र

कंत्राटी तत्वावर मनुष्यबळासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करा

अजित झळके

सांगली : शासकीय रूग्णालयांत कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्याचा सविस्तर आढावा घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठात्त्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा. तो मंत्रालय स्तरावर सादर करावा. आवश्‍यक पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. पाटील यांनी आढावा बैठक घेतली. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात सद्यस्थितीत 5 हजार 788 एकूण कोरोना बाधीत आहेत. त्यातील 2 हजार 517 उपचाराखाली आहेत. 3 हजार 70 रूग्ण बरे झालेत. महानगरपालिका क्षेत्रात तुलनेने प्रादुर्भाव जास्त आहे. सांगलीत उभारण्यात येत असणारे ऑक्‍सीजन प्लॅंट व मिरज येथील ऑक्‍सीजन प्लॅंटची क्षमता वृध्दी याबाबतही चर्चा केली. अधिग्रहित रूग्णालयांमधून रूग्णांकडून जादा दराने बिलांची आकारणी होऊ नये, यासाठी प्रत्येक खासगी रूग्णालयांवर शासकीय ऑडीटर नेमून खात्री करावी. रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला असावा. रूग्णाचा मृत्यू झाल्यास स्वॅबचा अहवाल येण्यात होत असलेला विलंब कमी करावा, असेही त्यांनी आदेश दिले. 


 
संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT