पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड दक्षिणमधूनच विधानसभा लढणार - पृथ्वीराज चव्हाण

सकाळवृत्तसेवा

सातारा - मी कुठून निवडणूक लढणार याबाबतच्या अनेक वावड्या उठत आहेत. पुणे, नागपूर, सांगलीतून लढणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, मी कुठेही जाणार नाही. आगामी विधानसभेची निवडणूक कऱ्हाड दक्षिणमधूनच लढवेन. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करीत राहणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे स्पष्ट केले. 

साताऱ्यातील काँग्रेस भवनात काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे पदग्रहण आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. त्या वेळी आमदार मोहनराव कदम, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर, शिवराज मोरे, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘आपल्यातील मतभेद बाजूला करून प्रत्येकाला पक्षात घेऊन सत्ता परिवर्तन हे एकच ध्येय ठेवून रणजितसिंहांनी वाटचाल करावी. जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यासाठी सर्व इतर जबाबदाऱ्या बाजूला ठेवून मी प्रत्येक तालुकास्तरावरील मेळाव्यास येण्यास तयार आहे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आता कामाला लागावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT