Prithviraj Chavan 
पश्चिम महाराष्ट्र

पृथ्वीराजबाबांचे ठरलं! अखेर येथेच लढणार

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कहो दिलसे... दक्षिण मे पृथ्वीराजबाबा फिरसे... अशी अखंड घोषणाबाजी करत कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभाच लढावी, यावर आज शिक्कामोर्तब झाले असून, पृथ्वीराज चव्हाण 3 ऑक्टोबरला अर्ज भरणार आहेत.

कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांना लोकसभेचा विचार न करता आमदारकीच लढविण्याचे सुचविल्यानंतर त्यांनी विधानसभेतच लढण्याचे ठरविले आहे. साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसने पहिल्या यादीत त्यांना स्थान दिले नसले तरी आज जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत त्यांचे कराड दक्षिणमधून नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी कऱ्हाड दक्षिणेतील बुथ कमिटी अध्यक्षांचा नियोजित मेळावा होता. त्यात आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आमदार चव्हाण यांचे नाव सातारा लोकसभेसाठी चर्चेत आल्याच्या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्याला मोठे महत्त्व आले होते. पण, ते विधानसभेतच लढणार हे निश्चित झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT