Khandoba Temple in Mangasuli esakal
पश्चिम महाराष्ट्र

पालीनंतर आता मंगसुळीच्या खंडोबा मंदिरात पाहायला मिळणार 20 किलोचा खांडा; बनवण्यात 60 हजारांचा आला खर्च

खंडोबा चरणी खांडा अर्पण करण्याची परंपरा जुनी आहे. जेजुरीच्या खंडोबाचा खांडा जगप्रसिद्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

पालीच्या खंडोबाला अर्पण केलेला खांडाही समारे १०५ किलो असल्याचे सांगितले जाते. मंगसुळी येथे अर्पण केला जाणारा २० किलोचा खांडा भक्तांना पाहायला मिळणार आहे.

सांगली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कर्नाटक राज्यातील मंगसुळी (ता. कागवाड) येथील खंडोबा मंदिरात (Mangsuli Khandoba Mandir) देवाचे शस्त्र असणारा खांडा (तलवार) आता पाहायला मिळणार आहे. बेडग (ता. मिरज) गावचे शस्त्रसंग्राहक पृथ्वीराज पंडितराव माने-सरकार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत आहे. श्री. माने यांनी त्यांच्या नवसपूर्तीसाठी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी ती प्रदान केली जाणार आहे.

तीन धातूंपासून तयार केलेला हा खांडा मुंबईत बनवला गेला आहे. त्याची लांबी साडेचार फूट असून रुंदी अर्धा ते पाऊण फूट, तर वजन २० किलो आहे. तो बनवण्यासाठी सुमारे ६० हजार रुपये खर्च आला आहे. माने यांच्या संग्रहात तलवारी, भाले, वाड्याची मोठी कुलपे, पानपुडे, दांडपट्टा यांसह अन्य अनेक शस्त्रे आहेत.

खंडोबा चरणी खांडा अर्पण करण्याची परंपरा जुनी आहे. जेजुरीच्या खंडोबाचा खांडा जगप्रसिद्ध आहे. अनेक भाविक तो उचलण्याचा प्रयत्न करतात. त्याचे वजन ४२ किलो असून अनेक मान्यवर, सेलिब्रिटी खांडा हातात घेऊन त्यासोबत छायाचित्र काढताना दिसतात. पालीच्या खंडोबाला अर्पण केलेला खांडाही समारे १०५ किलो असल्याचे सांगितले जाते. मंगसुळी येथे अर्पण केला जाणारा २० किलोचा खांडा भक्तांना पाहायला मिळणार आहे.

देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात तो ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी; म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता श्री खंडोबा चरणी अर्पण सोहळा होईल. विधिवत अभिषेक करून खांडा देवस्थानकडे अर्पण केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी व खांडाचे दर्शन घेण्यासाठी येण्याचे आवाहन माने परिवाराने केले आहे.

प्रसिद्ध देवस्थानात मंगसुळी येथील खंडोबाची ओळख आहे. मात्र, देवाचे शस्त्र असणारा खांडा तेथे नसल्याची उणीव भासत होती. अन्य खंडोबा देवस्थानात तो प्रमुख आकर्षण असतो. दसऱ्यावेळी देवासमोर त्याचा मान असतो. त्यानुसार मंगसुळी येथील देवस्थानाला तो देण्याची इच्छा होती. ती आता पूर्ण होत असल्याचे मोठे समाधान आहे.

-पृथ्वीराज माने, शस्त्रसंग्राहक, बेडग (ता. मिरज)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT