sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजन; भाग्यश्री खट्टे यांनी मिळवला प्रथम क्रमांक

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : समाजात निम्मी संख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा विश्वास युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.

इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ, महिला, युवक व युवतींच्या वतीने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिला भगिनींना श्री. पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, अरुणादेवी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे, सभापती सुनीता सपकाळ, रूपाली खंडेराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिक पाटील म्हणाले, सध्या आम्ही शहरात योजना आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमाचा हजारो नागरिक लाभ घेताना पाहून समाधान वाटते. महिलांच्यासाठी वेग-वेगळे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे." शहाजी पाटील, खंडेराव जाधव. रोझा किणीकर, उषा पंडीत मोरे, परिक्षक अनिल खटावकर यांची भाषणे झाली. स्पर्धेत भाग्यश्री खट्टे यांनी प्रथम, नेहा जाधव यांनी द्वितीय, सुरेखा विरकर यांनी तृतीय, सुप्रिया पेठकर यांनी चतुर्थ, संगीता कांबळे यांनी पाचवा क्रमांक पटकाविला.

स्मीता खटावकर, वैष्णवी भोसले, लक्ष्मी ताटे, माधुरी खोत, अंजली पेठकर, शैलेजा चव्हाण, राजश्री देशमुख, शारदा डुबल, कल्पना उभारे, रुची मानकर, अवंतिका क्षिरसागर, गिताजंली सूर्यवंशी, गौरी चिवटे, माधुरी पाटील याही स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, दीपा देशपांडे, शैलेजा जाधव, मनिषा पेठकर, भारती पाटील, प्रतिभा पाटील, सुवर्णा जगताप उपस्थित होते. प्रियांका साळुंखे यांनी स्वागत केले. पुष्पलता खरात यांनी आभार मानले. कमल पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT