पश्चिम महाराष्ट्र

रुपयाही भाव नसल्याने बोराच्या बागेवर फिरवला ट्रॅक्‍टर 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः डाळिंब-बोर पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्‍यातील उत्पादक यंदा अवकाळी पावसाने आणि कोसळलेल्या भावामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बोराला किलोसाठी एक रुपयाही भाव नसल्याने तालुक्‍यातील वाकी गावातील शेतकऱ्यांनी तीन एकरावरील बोर बागेवर ट्रॅक्‍टर फिरवला. 

बोरे घ्यायला कोणी नाही तयार 
वाकी येथील अनिल, सुनील, कुमार जाधव ही भावंडांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. साडेआठ एकरातील डाळिंब बागेत पावसामुळे सेटिंग झाले नाही. पण गेल्यावर्षी इतर शेतकऱ्यांनी बोर बागा तोडल्याने आमच्या बोराना चार पैसे मिळतील असे वाटत होते. पण रूपाया किलोने बोरे कोणी घ्यायला तयार नाही. व्यापाऱ्याला बोलावून बोरे विकत घ्यायला सांगितले. त्यावर बोरे तोडून 5 रुपये किलो भावाने विकत घेतो असे व्यापारी म्हणाला. प्रत्यक्षात 1 टन बोरे तोडण्यासाठी 10 जणांना द्यावा लागणारा रोजगार पाहता, खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे बाग तोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तासाला 500 रुपये याप्रमाणे 10 तासाचा खर्च द्यावा लागला. 

सफरचंद एवढी बोरे 
जाधव यांच्या बागेतील बोरे सफरचंदाच्या आकाराची झाली होती. तोड नसल्याने बोरे गळून पडून वास यायला लागला होता. मुळातच, 3 वर्षापूर्वीच्या बागेवर जाधवांनी लागवड, शेणखत, वरखत, फवारणी, मजुरी असा आतापर्यंत साडेसहा लाखपर्यंतचा खर्च केलाय. गेल्यावर्षी पहिले 50 टनाचे उत्पादन मिळाले होते. ही बोरे व्यापाऱ्यांना विकण्याबरोबर नागपूर बाजारपेठेत विकली होती. त्यातील 1 लाखाचा खर्च वजा जाता, 2 लाख मिळाले होते. उर्वरित खर्च यंदा निघेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यावर पाणी फिरले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT