पश्चिम महाराष्ट्र

ऊसतोड मजुरांचे थांबले व्यवहार ; गळितासाठी कारखान्यांना उसाचा प्रश्न गंभीर 

सकाळ वृत्तसेवा

कुकुडवाड ः यंदा कारखाना परिसरात असणारा मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे उसाचे क्षेत्र पाण्याखाली जाऊन नष्ट झाले. काही शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागातील छावण्यांना ऊस दिल्याने या वर्षीच्या गळीत हंगामासाठी कारखान्यांना उसाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यातच ऊसतोड मजुरांचे उचलीचे हप्ते लांबले आहेत. यामुळे मजुरांचे व्यवहार थांबले आहेत. 
पहिला हप्ता इशारा म्हणून पंचमीला दिला जातो. दुसरा उचलीचा हप्ता नारळी पौर्णिमेला आणि उर्वरित तिसरा हप्ता देऊन मुकादम मजुरांना ऊसतोडीस घेऊन जातात. मात्र, आतापर्यंत हप्ता मिळाला नसल्याने मजुरांत चिंता वाढली आहे. माणदेशात पावसाअभावी रोजगार उपलब्ध नाहीत. यामुळे मजुरांच्या हाताला काम पण नाही. काररखाना मुकादमास तर मुकादम मजुरांना विचारत नसल्याने मजुरांची घोर निराशा होत आहे. मागच्या वर्षीची हिशेबातील फेरबाकी कशी फेडायची आणि हे वर्ष गावात राहून काय करायचे, हा प्रश्न मजुरांना सतावत आहे.  मजूर उचलीची वाट पाहत असताना कारखान्यांनी आखडता हात घेतला आहे. यामुळे का
दरवर्षी माण तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी मजूर तोडणीच्या कामासाठी पश्‍चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतरित होतो. दसऱ्याला घराला कुलूप लावून ऊसतोड मजूर कुटुंब कबिल्यासह उसाच्या फडावर पोचतो. यंदाचे वर्ष मात्र, याला अपवाद ठरणार आहे. दसऱ्याला राज्यातील साखर कारखान्यांचे बॉयलर पेटतात. दिवाळीच्या मागेपुढे साखर उत्पादनास सुरवात होते. यंदा माण तालुक्‍यात असणारा दुष्काळ आणि कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात असणारा महापूर यामुळे उसाचे क्षेत्र चारा छावणीसाठी व महापुरामुळे कमी होणार आहे. त्याचा परिणाम ऊसतोड कामगारांवर होणार आहे. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या छावणीस ऊस दिला आहे. त्याचाही परिणाम यावर्षी गाळपावर होणार आहे. 


"" महापुरामुळे उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने करार पण लांबणीवर जाणार आहेत. त्यातच उचली कमी झाल्या आहेत. यंदा टोळीला सात ते साडेसात लाख मिळणार आहेत. एका कोयत्यास 70 ते 75 हजार मिळणार आहेत. अनेक कोयत्यांकडे मागील वर्षाची फेरबाकी असल्याने रोख रक्कम द्यायची अडचणच आहे.'' 
-दत्ता शिंदे (मुकादम) 

""यंदा उचल पण अजून मिळाली नसल्याने मजुरांची उपासमार होत आहे. त्यातच मागील वर्षीची फेरबाकीचे कर्ज डोक्‍यावर आहे. कारखाने किती दिवस चालतात, हे माहीत नाही. घरी थांबून तरी काय काम करणार, असा प्रश्‍न आहे.'' 
- दादा काळेल, ऊसतोड मजूर, वळई 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT