Problems of Paithan-Pandharpur route will be solved 
पश्चिम महाराष्ट्र

नाथांची पालखी आता बिकट वाटेने नव्हे जाणार धोपट मार्गाने! 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः राष्ट्रीय महामार्ग पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाच्या मोबादल्यामुळे तुर्तास रेंगाळले आहे. पंरतु, कायदेशीर नियम आणि जनभावना लक्षात घेऊन लवकरच यासंदर्भात तोडगा काढला जाणार आहे, असे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून देण्यात आले. 

तीन तालुक्यांतील आहे प्रश्न

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाट सुखकर व्हावी, यासाठी पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. 
जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी व जामखेड तीन तालुक्‍यातील अंतर 39 किलोमीटर असून 17 किलोमीटरचे म्हणजेच 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लोकांच्या जमीन अधिग्रहणपोटी मिळणाऱ्या मोबदल्याच्या अपेक्षामुळे तुर्तास रेंगाळले आहे.

आढावा बैठक घेतली

जमीन अधिग्रहणबाबत असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयात काल (शुक्रवार) आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अजय मोरे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, अर्चना नष्टे, राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता पी. एस. औटी आदी उपस्थित होते. 

"या' गावांचा मार्गात समावेश 
पाथर्डी- भालगाव, मिडसांगवी, कासाळवाडी. शेवगाव-मुंगी, हातगाव, शेकटे, लाडजळगाव, बोधेगाव. जामखेड- दिघोळ, मोहरी, खर्डा. 

पाठपुरावा सुरू आहे
पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम लवकरच मार्गी लागावे, यासाठीच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात आपला सातत्याने पाठपुरावा राहील. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT